मुंबई : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. त्यापूर्वी राज्यातील काही महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची (IPS Offices Posting) शक्यता कमी आहे. ठाकरे सरकारच्या काळात प्रलंबित असलेल्या मुंबईसह राज्यातील पोलिसांच्या बदल्या अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने केल्या. अनेक पोलिस अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती केली असून मंगळवारी तब्बल ३० वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. मात्र, अजूनही देवेन भारती आणि भूषण उपाध्याय यांच्यासह डझनहून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रतीक्षेत (waiting of new Posting in Maharashtra ) आहेत.
मुंबई, ठाणे आणि नागपूरची जोरदार चर्चा : राज्यातील मुंबई, ठाणे आणि नागपूर या तीन शहरांच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या झालेल्या नाहीत. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात फोन टॅपिंगच्या वादात सापडलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला ( IPS Rashmi Shukla ) यांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
मुंबई, ठाणे आणि नागपूरची जोरदार चर्चा : राज्यातील मुंबई, ठाणे आणि नागपूर या तीन शहरांच्या पोलीस आयुक्तांच्या बदल्या झालेल्या नाहीत. याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. यापूर्वी ठाकरे सरकारच्या काळात फोन टॅपिंगच्या वादात सापडलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना या प्रकरणातून क्लीन चिट मिळाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती.
वेटिंगमध्ये असलेले पोलीस अधिकारी : अशा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये विनीत अग्रवाल, सुहास वारके, राजकुमार विटकर, जयंत नाईकनवरे, बी.जी.शेखर, संजय दराडे, वीरेंद्र मिश्रा यांच्या नावांचा समावेश आहे. याशिवाय भूषण उपाध्याय, देवेन भारती, ब्रिजेश सिंग, विपीन कुमार सिंग, प्रभात कुमार, महेश पाटील आणि संजय शिंत्रे यांच्यासह डझनहून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकारी साईट शाखेत असून आपल्या बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर आणल्याची चर्चा आहे. तसेच अनेक अनूजही काही खास आयपीएस अधिकारी क्रीम पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळत आहे.