नवी मुंबई : रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गुटख्याचा ट्रक पकडत (Police caught Gutkha truck) तब्बल 62 लाखांचा गुटका जप्त (Police seized Gutkha) केला आहे. या प्रकरणी एकास अटक (arrested in Gutkha smuggling case) केले असून चार जण फरार आहेत. (Latest news from Mumbai) सागर गोहेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Gutkha Seized), (Mumbai Crime)
ट्रकचालक कारमध्ये बसून पळाला : रबाळे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना एक संशयित ट्रक पोलिसांच्या पाहण्यात आला. ट्रकचालक व काही व्यक्तीचे बोलणे सुरू होते. या सर्व संशयास्पद हालचाली लक्षात आल्यावर ही बाब गस्त घालत असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना कळवली. त्यांनी तत्काळ गुन्हे प्रगटीकरण विभागाचे पथक रवाना केले. दरम्यान पोलीस पथकाने सापळा रचल्याचे लक्षात येताच ट्रक चालक शौकत आणि इतर चार जण एका कारमध्ये बसून पळून गेले. तर ज्याने ट्रकमधील माल घेतला तो पोलिसांच्या हाती सापडला. त्याचे नाव सागर गोहेल असल्याचे समोर आले. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ट्रक चालक शौकत याने माल दिल्याची माहिती दिली.
गुटखा जप्त : या ट्रकमध्ये पाहणी केली असता राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. तब्बल 61 लाख 36 हजार 132 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून (जी.जे.01 जे टी 2570) या क्रमांकाचा ट्रक आणि आणखी एक वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. या ट्रकचा क्रमांक पाहता हा गुटखा गुजरात हून आला होता. मात्र कोणी पाठवला या मागे कोण आहे ? पळून गेलेल्या लोकांचा यात काय सहभाग आहे. याबाबत तपास सुरु आहे.