ETV Bharat / state

कर्नाटक वॉर : बंडखोर आमदार 'रेनिसन्स'मध्ये, हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

author img

By

Published : Jul 10, 2019, 5:54 AM IST

Updated : Jul 10, 2019, 6:19 AM IST

त्याबरोबरच या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हेही पोहोचले आहेत.

कर्नाटक वॉर : हॉटेल रेनिसन्सबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई - मुंबईमधील रेनिसन्स हॉटलबाहेर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल आणि दंगल नियंत्रण पथकाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेनिसन्स हॉटेलमध्ये थांबलेल्या कर्नाटकातील काँग्रेसच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी येथील सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, कर्नाटकचे मंत्री डी.के. शिवकुमार यांच्या भेटीपूर्वी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी केली होती.

  • Mumbai: Dilip Sawant, Additional Commissioner of Police (Northern Region) reaches Hotel Renaissance in Powai where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. #Maharashtra pic.twitter.com/9WbFpK6pko

    — ANI (@ANI) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याबरोबरच या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत हेही पोहोचले आहेत. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी काँग्रेसने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली होती. तर सत्ताधारी पक्षांतील 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी सादर केलेले राजीनामे विहित नमुन्यात नसल्याने त्यांना पुन्हा राजीनामा पत्र पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले. दरम्यान, बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार आज मुंबईत येणार असल्याची माहिती होती. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही, असे म्हणत काँग्रेस आमदारांनी सुरक्षेची मागणी केली आहे.

मुंबई पोलिसांना या बंडखोर आमदारांनी एक पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी 'आम्ही कर्नाटकातील आमदार मुंबईतील हॉटेल रेनिसन्स पवई येथे राहात आहोत. आम्ही ऐकले आहे की, कुमारस्वामी आणि डी.के शिवकुमार हॉटेलच्या परिसरात आम्हला भेटण्यासाठी येणार आहेत. मात्र, आम्हला त्यांना भेटायचे नाही. त्यामुळे त्यांना हॉटेल परिसरात प्रवेश करण्यास परवानगी देऊ नका, असे आमदारांनी पत्रात नमुद केले आहे. या पत्रावर 10 आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Intro:Body:

12323123

Conclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 6:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.