ETV Bharat / state

चार महिन्यांनी खुनाचा उलगडा; सहकारीच निघाला खुनी - आरोपी अटकेत

मुलुंड पूर्व येथील केळकर कॉलेजच्यामागे ओसाड जागेत 28 जानेवारी 2019 रोजी एका व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणात मृताचा चेहरा जळालेला असल्याने त्याची ओळख पटत नव्हती. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या 29 तारखेलाही त्याच ठिकाणी आणखी एका नेपाळी व्यक्तीवर अशाच प्रकारे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळ व दोन्ही गुन्ह्यात साम्य असल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले. त्यानुसार नवघर पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली.

सहकारीच निघाला खुनी
author img

By

Published : Jun 26, 2019, 2:15 AM IST

मुंबई - मुलुंड पूर्व येथील केळकर कॉलेजच्या पाठीमागे ओसाड जागेत २८ जानेवारीला विजय किशोर यादव या व्यक्तीचा खून झाला होता. यावेळी मृतदेहाचा चेहरा जाळून गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यात आला होता. दरम्यान, खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलुंडमधील नवघर पोलिसांना तब्बल ४ महिने लागले.

दोन्ही गुन्ह्यातील आरोपी व घटनेबद्दलची माहिती देताना पोलीस अधिकारी

या प्रकरणात नवघर पोलिसांनी योगेश एकनाथ राणे (वय ३३ वर्षे) यास अटक केली आहे. दरम्यान, मुलुंडमध्येच एका नेपाळी माणसावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेसंदर्भातील तपासादरम्यान नवघर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

पहिल्या घटनेत मुलुंड येथे २८ जानेवारीला व्यायाम काढण्याच्या लोखंडी दंभेलच्या क्षुल्लक कारणावरून आरोपी योगेश राणे आणि विजय या दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून राणे याने विजय यास नशा करून मुलुंडच्या केळकर कॉलेजच्या पाठीमागील अडगळीत जागेत घेऊन गेला. तिथे त्याने विजयवर दगड व टणक वस्तूंनी हल्ला करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा जाळला.

या घटनेनंतर एप्रिल महिन्यात २९ तारखेला त्याच ठिकाणी आणखी एका नेपाळी व्यक्तीवर अशाच प्रकारे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नौराज रेगमी (३०) असल्याचे नवघर पोलिसांना कळाले. तर हा गुन्हा त्याचाच सहकारी योगेश राणे याने केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे नवघर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चेंबूर घाटला येथून योगेश राणेला अटक केली होती.

योगेश राणे आणि जखमी नौराज रेगमी हे दोघे मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या विश्वभारती या हॉटेलात कामाला होते. योगेश हा हॉटेलमध्ये चहा बनवण्याचे काम करीत होता. तर नवराज हा टेबल बॉय म्हणून काम करीत होता. या हॉटेलमध्ये टेबल बॉय म्हणून काम करणारा विजय किशोर यादव हा जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.

घटनास्थळ तसेच दोन्ही गुन्ह्यातील मारण्याच्या पद्धतीवरून जानेवारीत मिळून आलेला मृतदेह विजयचा असावा हा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला. त्यानुसार पोलिसांनी विश्वभारती हॉटेल व्यवस्थापकाकडे त्यांच्या हॉटेलात काम करणारा नोकर बेपत्ता झाल्याप्रकरणी चौकशी केली. यावेळी हॉटेल व्यवस्थापकाने सांगितले, की आमच्याकडे दररोज अनेक कामगार येतात. त्यांना पटले नाही तर ते काम सोडून निघून जातात. विजय हा देखील तसाच काम सोडून गेला असेल. म्हणून आम्ही तक्रार केली नाही, असे हॉटेल व्यवस्थापकाने उत्तर दिल्याचे परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी सांगितले.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी चेहर्‍याची पुनर्निर्मिती करण्यात आली

मृत विजय यादव याच्या खूनाचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने मृतदेहाचा चेहरा जाळला होता. त्यामुळे मार्च महिन्यात नवघर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील ऑस्टिओलॉजी विभागाची मदत घेतली. तेथील डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या चेहर्‍याची पुनर्निर्मिती करून त्या व्यक्तीचा चेहरा पूर्वीच्या चेहर्‍याशी मिळता जुळता तयार केला होता. मात्र, तरीही मृताची ओळख पटत नाही. दरम्यान, नौराज रेगमी याने हा चेहरा विजयचा असून तो हॉटेलमध्ये काही दिवस कामाला होता, असे आपल्या जबाबात सांगितले.

विजय यादव हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्यामुळे त्याचा भाऊ रामकिशोर यादव यास पोलिसांनी मुंबईत बोलावून घेतले. त्यानंतर मृतदेहाचे आणि रामकिशोरची डीएनए चाचणी करण्यात आली. अखेर गेल्या आठवड्यात डीएनएचा अहवाल पोलिसांच्या हाती आला. त्यात विजयच्या भावाची आणि मृतदेहाचे डीएनए जुळल्याने मृतदेहाची ओळख पटण्यास पोलिसांना मदत मिळाली.

दरम्यान, नौराज रेगमी याच्यावर जीवघेण्या हल्ला केल्याप्रकरणी योगेश राणे हा तळोजा जेलमध्ये होता. तेथून विजयच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, याआधीही योगेशने श्रीवर्धन येथे गुन्हा केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

Intro:चार महिन्यांनी खुनाचा उलगडा सहकारीच निघाला खुनी

मुलुंड पूर्व येथील केळकर कॉलेजच्या पाठीमागे ओसाड जागेत 28 जानेवारी 2019 ला विजय किशोर यादव या व्यक्तीचा खून करून चेहरा जाळून विद्रूप व गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यात आला होता. खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलुंडमधील नवघर पोलिसांना तब्बल ४ महिने लागले .
नवघर पोलिसानी योगेश एकनाथ राणे वय 33 वर्षे यास अटक केली आहे. पहिल्या खुनातील मयताची ओळख निर्माण करण्यासाठी चेहर्‍याची पुनर्निर्मिती करून तपासात साम्य आढळून आले त्यामुळे चार महिण्यापूर्वीच्या खुनाचा गुन्हा नवघर पोलिसानी उघड करीत आरोपीस अटक केलीBody:चार महिन्यांनी खुनाचा उलगडा सहकारीच निघाला खुनी

मुलुंड पूर्व येथील केळकर कॉलेजच्या पाठीमागे ओसाड जागेत 28 जानेवारी 2019 ला विजय किशोर यादव या व्यक्तीचा खून करून चेहरा जाळून विद्रूप व गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्यात आला होता. खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलुंडमधील नवघर पोलिसांना तब्बल ४ महिने लागले .
नवघर पोलिसानी योगेश एकनाथ राणे वय 33 वर्षे यास अटक केली आहे. पहिल्या खुनातील मयताची ओळख निर्माण करण्यासाठी चेहर्‍याची पुनर्निर्मिती करून तपासात साम्य आढळून आले त्यामुळे चार महिण्यापूर्वीच्या खुनाचा गुन्हा नवघर पोलिसानी उघड करीत आरोपीस अटक केली.

मुलुंड मध्ये घडलेल्या या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपी व मृत इसम आणि जखमी इसम मुलुंड मधील विश्वभारती हॉटेलात काम करणारे आहेत, पहिल्या घटनेत व्यायाम काढण्याचे लोखंडी दंभेलच्या क्षुल्लक कारणावरून चीड आलेल्या राणेने विजयकुमार यास नशा करून मुलुंडच्या केळकर कॉलेजच्या पाठीमागील अडगळीत जागेत घेऊन गेला व दगड व टणक वस्तूंनी त्यास हल्ला करून चेहरा जाळण्यात आला यामुळे आपल्याला पोलीस पकडणार नाहीत.पुरावा मिळणार नाही.असे योगेश राणेला वाटले .

या दरम्यान एप्रिल महिन्यात 29 तारखेला केळकर कॉलेजच्या पाठीमागे त्याच ठिकाणी आणखी एका नेपाळी व्यक्तीवर अशाच प्रकारे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, या हल्ल्यात जखमी झाल्याचे नाव नौराज रेगमी (३०) असल्याचे नवघर पोलिसांना कळाले. हा गुन्हा त्याचाच सहकारी योगेश राणे याने केल्याचे उघड झाले होते. नवघर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चेंबूर घाटला येथून योगेश राणेला अटक केली होती.

योगेश राणे आणि जखमी नौराज रेगमी हे दोघे मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणार्‍या विश्वभारती या हॉटेलात कामाला होते. योगेश हा हॉटेलमध्ये चहा बनवण्याचे काम करीत होता तर नवराज हा टेबल बॉय म्हणून काम करीत होता. या हॉटेलमध्ये टेबल बॉय म्हणून काम करणारा विजय किशोर यादव हा जानेवारीपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. घटनास्थळ,तसेच दोन्ही गुन्ह्यातील मारण्याच्या पद्धतीवरून जानेवारीत मिळून आलेला मृतदेह विजय किशोर याचा असावा हा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरु केला.व नौराज रेगमी यांनी विजय किशोरचा हा चेहरा आहे व तो हॉटेल मध्ये काही दिवस कामाला होता असे जबाब मध्ये सांगितले

विजय किशोर हा मूळचा उत्तर प्रदेशचा असल्यामुळे त्याच्या भाऊ रामकिशोर यादव यास पोलिसांनी मुंबईत बोलावून घेतले.मृतदेहाचे आणि विजय किशोर याची डीएनए चाचणी करण्यात आली.अखेर गेल्या आठवड्यत डीएनएचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असता विजयकिशोरच्या भावाची आणि मृतदेहाचे डीएनए जुळले आणि मृदेहाची ओळख पटली. पोलिसांनी या प्रकरणी योगेश राणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन न्यायालयीन कोठडीत तळोजा जेल मध्ये असलेल्या योगेशला विजय किशोरच्या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.या आधी योगेश ने श्रीवर्धन येथे गुन्हा केल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

विश्वभारती हॉटेलात काम करणारा नोकर गुढरित्या बेपत्ता झाला असल्याने पोलीस चौकशीत हॉटेल व्यवस्थापकांनी आमच्याकडे दररोज अनेक कामगार येतात, त्यांना पटले नाही तर ते काम सोडून निघून जातात विजय किशोर देखील तसाच काम सोडून गेला असेल म्हणून आम्ही तक्रार केली नाही, असे हॉटेल तर्फे सांगण्यात आले आहे. असे परिमंडळ 7 चे पोलीस उपआयुक्त अखिलेश कुमार सिंग म्हणाले.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी चेहर्‍याची पुनर्निर्मिती करण्यात आली

मार्च महिन्यांत नवघर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी केईएम हॉस्पिटलमधील ऑस्टिओलॉजी विभागाची मदत घेतली. तेथील डॉक्टरांनी मृत इसमाच्या चेहर्‍याची पुनर्निर्मिती करून त्या व्यक्तीचा चेहरा पूर्वीच्या चेहर्‍याशी मिळता जुळता तयार केला होता. मात्र तरीही मृताची ओळख पटत नव्हती.यातच लोकसभा निवडणूक आल्यानंतर देखील नवघर पोलिसानी तपासात सातत्य व चिकाटी ठेवली होती . यामुळे अश्या अट्टल गुन्हेगारास पोलिसानी अटक केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.