ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : जरांगेंच्या उपोषणाची धग पोलीस दलापर्यंत; पोलिसांनी दिला राजीनामा... - जालना पोलीस दल

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता, मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे (Shivaji Satwaji Bhagde) असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 5:16 PM IST

Updated : Oct 28, 2023, 5:54 PM IST

मुंबई Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे दुसऱ्यांदा मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याकरता उपोषण सुरू केलंय. त्यांचा उपोषणाचा परिणाम राज्यभर दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी तर आहेच, परंतु मराठा समाज अत्यंत आक्रमक देखील झालाय. त्याचा परिणाम म्हणून जालना पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भागडे (Shivaji Satwaji Bhagde) यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून, पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. तसं पत्र जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे 27 ऑक्टोबर रोजी सादर केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय : मनोज जरांगे पाटील यांच्या, मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठीच्या मागणीमुळे राज्यातील समस्त कुणबी आणि मराठा यातील बहुसंख्य जनता त्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध मार्गाने सक्रिय झाली आहे. जरांगे पाटील यांनी 40 दिवसांपूर्वी पहिल्या उपोषणाच्या दरम्यान राज्य शासनाला नमतं घ्यायला लावलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या सर्वांनीच आणि अवघ्या मंत्रिमंडळानं मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं.

Manoj Jarange Patil
पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा

मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे दुःख वाटत आहे. महाराष्ट्रभर संपूर्ण मराठा समाज विविध मार्गाने उपोषण, आंदोलन करत आहे. परंतु शासन याची दाखल घेत नाही. परंतु अवघा मराठा समाज राज्यभर याबाबत आंदोलन करत आहे. मी पण मराठा समाजाचा असल्यानं समाजाचं काही तरी देणं लागतं म्हणून पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा देत आहे. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे राजीनामापत्र पाठवलं आहे. - शिवाजी सटवाजी भागडे, पोलीस कॉन्स्टेबल

पुन्हा एकदा उपोषण सुरू : आता 40 दिवस झाले आणि आश्वासनाची पूर्तता नसल्यामुळे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलंय. या उपोषणाचा परिणाम म्हणून 'पक्ष गेले चुलीत नेते गेले खड्ड्यात' अशी घोषणा मराठवाड्यातील मराठा समाजाकडून दिली गेली. प्रत्येक नेत्यांना गावबंदी जारी केली गेली. या गावबंदीचं लोण आता राज्याच्या विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र येथे पसरलं आहे. परंतु या सगळ्याचा परिणाम आता जालना जिल्ह्यातील पोलीस दलावर झालेला दिसत आहे.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation Updates : १० हजार पानांचे पुरावे असूनही मराठा आरक्षण नाही, राज्य सरकारचे षडयंत्र- मनोज जरांगे पाटील
  2. Sharad Pawar On Maratha Reservation : आश्वासनं पाळता येत नसतील तर देऊ नये; मराठा आरक्षणावरुन शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
  3. Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक; धाराशिवमध्ये शिंदे समितीची गाडी अडवली; पहा व्हिडिओ

Last Updated : Oct 28, 2023, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.