ETV Bharat / state

नवजात बाळांची तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी गजाआड; गुन्हे शाखेचे कारवाई - कल्याण

नवजात बाळांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत ५ महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे.

नवजात बाळ विकणाऱ्या महिला टोळीला अटक
author img

By

Published : Jul 1, 2019, 10:26 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत नवजात बाळांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या ६ जणांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत ५ महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे.

मागील काही वर्षात मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, कुर्ला व कल्याण परिसरात सतर्क राहिलेल्या या टोळीने आतापर्यंत शेकडो मुलांची तस्करी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत ३ वर्षाचा मुलगा व ३ महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका केली असून त्यांना पुढील तपासासाठी बालसुरक्षा गृहात ठेवण्यात आले आहे.

नवजात बाळ विकणाऱ्या महिला टोळीला अटक

पोलिसांनी याप्रकरणी सुनंदा बिका मसाने, सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री कदम, आशा उर्फ ललिता जोसेफ या महिला आरोपींना अटक केली आहे. या सर्व महिला आरोपी वेगवेगळ्या रुग्णालयात आयाचे काम करीत होत्या. अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिला आरोपी या मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, ठाणे, कल्याण परिसरात आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबाला गाठून त्यांचे नवजात मूल दत्तक देण्याचे आमिष दाखवत होते. मूल कायदेशीररित्या दत्तक दिल्यावर लाखो रुपये मिळतील व मुलाच्या आईवडिलांना हवे तेव्हा प्रत्यक्ष भेटता येईल, असे या टोळीतील महिला आरोपी सांगत होत्या.

अशाच प्रकारे दत्तक मूल देण्याच्या नावाखाली या महिला आरोपींनी ३ वर्षाच्या मुलाचे व ३ महिन्यांच्या बाळाचे प्रत्येकी ४ लाखात सौदा करून एका महिला व एका पुरुषाला विकले होते. विकलेल्या मुलांच्या पालकांना काही महिन्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही त्यांना भेटता न आल्याने याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. तपास गुन्हे शाखेकडून बनावट ग्राहक बनून मूल घेण्याच्या बहाण्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. याप्रकरणी मूल विकत घेणाऱ्या एका पुरुष व एक महिला आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत नवजात बाळांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या 6 जनांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत 5 महिला व 1 पुरुषाला अटक केली असून गेल्या काही वर्षात मुंबईतील गोवंडी , मानखुर्द, कुर्ला व कल्याण परिसरात सतर्क राहिलेल्या या टोळीने आता पर्यंत शेकडो मुलांची तस्करी केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी आता पर्यंत केलेल्या कारवाईत 3 वर्षाचा मुलगा व 3 महिन्याच्या बाळाची सुखरूप सुटका केली असून पुढील तपासासाठी सुटका करण्यात आलेल्या मुलाला व बाळाला बालसुरक्षा गृहात ठेवण्यात आले आहे.
Body:पोलिसांनी या प्रकरणी सुनंदा बिका मसाने, सविता मंगेश साळुंखे, भाग्यश्री कदम, आशा उर्फ ललिता जोसेफ, या महिला आरोपीना अटक केली असून या सर्व महिला आरोपी वेगवेगळ्या रुग्णालयात आया चे काम करीत होत्या.अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिला आरोपी ह्या मुंबईतील कुर्ला , मानखुर्द , ठाणे, कल्याण परिसरात आर्थिक दृष्ट्या गरजू कुटुंबाला गाठून त्यांचे नवजात मूल दत्तक देण्याचे आमिष दाखवत होते. मूल कादेशीर रित्या दत्तक दिल्यावर लाखो रुपये मिळतील व मुलाच्या आईवडिलांना हवे तेव्हा प्रत्यक्ष भेटता येईल असं या टोळीतील महिला आरोपी सांगत होत्या. Conclusion:अशाच प्रकारे दत्तक मूल देण्याच्या नावाखाली या महिला आरोपीनी 3 वर्षाच्या मुलाचे व 3 महिन्यांच्या बाळाचे प्रत्येकी 4 लाखात सौदा करून एका महिला व एका पुरुषाला विकले होते. विकलेल्या मुलांच्या पालकांना काही महिन्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही त्यांना भेटता न आल्याने याची तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती. तपास गुन्हे शाखेकडून बनावट ग्राहक बनून मूल घेण्याच्या बहाण्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपीना अटक केली आहे. या प्रकरणी मूल विकत घेणाऱ्या एका पुरुष व एक महिला आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीना न्यायालयाने 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.