मुंबई - पोलीस निरीक्षकास अडीच लाख रुपयांची लाच घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. दत्तात्रय गोविंद चौधरी (50) असे अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तो देवनार पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
देवनार पोलीस ठाण्यात तक्रादार, त्याचा भाऊ व मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल होता. ज्यात या तिघांनाही न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला होता. दाखल गुन्ह्याचा तपास आरोपी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चौधरी हा करत होता. या प्रकरणी पीडित तक्रारदाराच्या विरोधात अटकेची कारवाई न करता गुन्ह्यात सहकार्य करण्याकरिता दत्तात्रय चौधरी याने पीडित तक्रारदाराकडे 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तडजोडअंती २ लाख ५० हजार रुपायांची लाच देण्याचे ठरले होते. सदरच्या रकमेतील ८० हजारांचा पहिला हफ्ता घेताना दत्तात्रय चौधरी या पोलीस अधिकाऱ्यास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.