ETV Bharat / state

Gangrape Case: कुर्ला गँगरेप प्रकरणात पोलिसांकडून एकाला अटक - कुर्ला गँगरेप प्रकरणात एकाला अटक

आठवडाभरापूर्वी कुर्ला येथे एका महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एका आरोपीस नागपाडा येथून अटक करण्यात आले. या प्रकरणात कुर्ला पोलिसांनी ही पहिली अटक केली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : Dec 6, 2022, 10:53 PM IST

मुंबई - सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींपैकी एकाला जी अटक झाली त्याचे नाव मोहम्मद याकूब सिद्दिकी उर्फ बबलू (40) असे आहे. पोलिसांनी दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातून याला अटक केली आहे. कुर्ला पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आज मंगळवार (दि. 6 डिसेंबर)रोजी एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी एका 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. कुर्ला पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. त्या पथकाच्या माध्यमातून एकाला दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरातून अटक करण्यात आली.

खुनाच्या प्रयत्न - 30 नोव्हेंबर रोजी, एका 42 वर्षीय महिलेवर तीन पुरुषांनी सामूहिक बलात्कार केला होता. तिच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि सिगारेटने तिच्या गुप्तांगात चटके दिले होते. तपासात आरोपींचा डिझेल, वीज चोरी आणि इतर किरकोळ गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत पोलिसांना आरोपींना पकडण्याचे निर्देश दिले होते. महिला आयोगाने पीडितेला कायदेशीर मदतही दिली आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

तिघांवरही गुन्हा दाखल - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडितेवर बलात्कार केला आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. त्यांनी सिगारेटने तिच्या प्रायव्हेट पार्टला चटके दिले आणि तिच्या छातीवर आणि हातावर धारदार शस्त्रांनी वार केले. एका आरोपीने या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलिसांकडे गेल्यास तो व्हायरल करण्याची धमकी दिली. कुर्ला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिच्या शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि एफआयआर नोंदवण्यात आला. तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेच्या छातीवर धारदार शस्त्राने वार : ही घटना बुधवारी पहाटे कुर्ला येथे घडली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. आरोपी आणि पीडित महिला एकाच ठिकाणी राहतात. पीडितेवर आरोपींनी एकामागून एक आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी तिच्यावर एकामागून एक बलात्कार तर केलाच शिवाय तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार देखील केला. त्यांनी तिच्या प्रायव्हेट पार्ट्सवर सिगारेटचे चटके दिले. त्याचप्रमाणे तिच्या छातीवर आणि दोन्ही हातांवर धारदार शस्त्राने वार केले. एका आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिला पोलीस ठाण्यात गेल्यास तो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी पुढे माहिती पोलिसांनी दिली.

एनजीओसी संपर्क साधल्यावर पोलीस सतर्क : कुर्ला पोलिस ठाण्यात याबाबत तीन आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६डी (सामूहिक बलात्कार), ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध), ३२४ (शस्त्राने दुखापत करणे) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुर्ला पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने तिचा त्रास शेजाऱ्यांना सांगितला. त्यांनी एका एनजीओशी संपर्क साधला आणि मग आमच्या पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा नोंदवला गेला. आरोपी सध्या फरार असून कुर्ला पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गुन्ह्यांमध्ये १३.२% वाढ झाली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या 'क्राइम इन इंडिया 2021' अहवालानुसार, भारतात 2021 मध्ये बलात्काराच्या 31,677 घटनांची नोंद झाली. दररोज सरासरी 86 प्रकरणे तर दर तासाला महिलांवरील गुन्ह्यांची 49 प्रकरणे नोंदवली गेली. आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत २०२१ मध्ये महिलांवरील एकूण गुन्ह्यांमध्ये १३.२% वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अ‍ॅसिड हल्ला, पती/त्याच्या नातेवाईकांकडून क्रूरता आणि घरगुती हिंसाचार अशा प्रकारे महिलांवरील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.