मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या महिलेला दादर पोलिसांनी पकडले आहे. काजल राजाराम सिंग (३७) असे या चोराचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून २९ मोबाईल जप्त केले आहेत.तक्रारदार आयुष माने सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांचा अँपल आयफोन मोबाईल चोरी झाला होता. त्यानंतर माने यांनी दादर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन सदरील महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. काजल राजाराम सिंग (वय 37) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
तीन लाखांचे फोन जप्त : पोलीस चौकशीत काजलने ३५ मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिच्याकडून माने यांचा चोरीस गेलेला अँपल आयफोन तसेच इतर 29 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये आयफोन तसेच वेगवेगळ्या कंपन्यांचे अँड्रॉइड मोबाईल आढळून आले आहे. तित्याकडून एकूण 3 लाख 80 हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याचप्रमाणे अधिक तपास सुरु असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी : सिद्धीविनायक परिसरात अथवा दादर, प्रभादेवीसारख्या आजूबाजूच्या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईलवर डल्ला मारतात. अशीच एक मोबाईल चोरणारी महिला पोलिसांच्या पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. सिद्धिविनायक मंदिर परिसर, आसपासचा परिसर अथवा दादर बसस्थानकातून मोबाईल चोरीला गेलेल्या व्यक्तींनी तात्कळ दादर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन दादर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहश मुगुटराव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले आहे.
भायखळा कारागृहात रवानगी : आरोपी महिलेला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठवले असून आरोपी काजलची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या महिलेला अटक करण्यासाठी पोलीस उपयुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश कानडे, दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर शिवलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद काकड, सहाय्यक पोलीस निरीक्षक (सिद्धिविनायक मंदिर), सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पायघन, रामकृष्ण सागडे गुन्हे प्रगटीकरण अधिकारी, पोलीस अंमलदार मनोज सुतार, सागर निकम, मनीष मोरे, दया शिंदे, मच्छिंद्र पाटील, दिनेश विषे, महिला पोलीस अंमलदार नीता लुबाळ तसेच गुन्हे प्रकटीकरण पथक, सिद्धिविनायक मंदिर कर्मचारी ओंकार बारस्कर यांनी अथक मेहनत घेऊन आरोपी महिलेला अटक केली.
हेही वाचा - Thane Gang Rape : ठाकुर्लीतील खाडी किनारा परिसरात भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार