मुंबई - व्यवसाय सुरू करण्यासाठी इतर व्यावसाईकांचे भांडे ( Police Arrested Accused In pots Theft ) चोरणाऱ्या चोरट्यांच्या शिवाजी नगर पोलिसांनी ( Shivaji nagar Police Station ) मुसक्या आवळल्या आहेत. या चोरट्यांना आपला केटरिंगचा व्यवसाय सुरू करायचा होता, मात्र भांडवल नसल्याने त्यांनी चोरीचा व्यवसाय ( pots Theft For Start Own catering business ) निवडला आणि फसले. शिवाजी नगर पोलिसांनी त्यांना भांडेचोरीप्रकरणी अटक केले आहे. आबिद सय्यद, शोएब खान आणि आफताब खान असे भांडे चोरुन केटरिंगचा ( catering business In Mumbai ) व्यवसाय सुरू करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
4 लाखांचा घातला गंडा तक्रारदार शफी मोहम्मद शेख यांची भांडी चोरुन चोरट्यांनी त्यांना तब्बल 4 लाखांचा गंडा घातला आहे. चोरलेल्या भांड्यांची एकूण किंमत 4 लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना तीनही आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीची भांडी जप्त करण्यात यश आले. आरोपींची नावे आबिद सय्यद, शोएब खान आणि आफताब खान अशी असून त्यांनी परिसरातील इतर केटरर्सना चांगले काम करून पैसे कमवताना पाहिले होते. त्यांना त्याच व्यवसायात प्रवेश करायचा होता. मात्र, त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी एक पैसाही नव्हता आणि म्हणून त्यांनी भांडी चोरण्याचा निर्णय घेतला. तो व्यवसायातील सर्वात महाग घटक आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कार्यक्रमासाठी भाड्याने घेतले भांडे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी त्याला आरोपी सय्यदने परस्पर मित्रामार्फत संपर्क साधला होता. सय्यदने शेख यांना सांगितले की, त्यांचे राहत्या घरी एक कार्यक्रम आहे आणि त्यांना मोठ्या आकाराची भांडी भाड्याने घेण्याची गरज आहे. त्यानुसार, शेखने 2 हजार रुपयांच्या बदल्यात दोन दिवसांच्या कालावधीसाठी 16 अॅल्युमिनियमची भांडी, दोन मोठी भांडी, 18 झाकण आणि पाच सर्व्हिंग चमचे भाड्याने दिले होते. मी भांडी सय्यदच्या शिवाजी नगर येथील निवासस्थानी पोहोचवली आणि 24 डिसेंबरला तो मला परत देईल असा करार झाला. मी निघण्यापूर्वी सय्यदने मला 2 हजार आगाऊ दिले,” असेही तक्रारदार शेखने आपल्या जबाबत पोलिसांना सांगितले. तीन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी सय्यद आणि त्याच्या साथीदारांना गोवंडी-शिवाजी नगर परिसरातील विविध भागातून ताब्यात घेतले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून चोरीची भांडी जप्त करण्यात आली.