मुंबई: पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार मुख्य आरोपी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेव्हणा मैयंक मेहताच्या सिंगापूर मधील बँक खात्यामध्ये जमा झालेल्या पैशाचा माहिती मिळवण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने बँक अधिकाऱ्यांना माहिती देण्याकरिता विनंती केली आहे. सीबीआयने विशेष कोर्टामध्ये केलेल्या अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. त्यामुळे मैयंक मेहता यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
रक्कम सिंगापूर येथील बँक खात्यात जमा: पंजाब नॅशनल बँक प्रकरणात तपास करत असलेल्या सीबीआयने असा दावा केला आहे की, या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदीचा मेव्हणा मैयंक मेहता यांच्या दुबई येथील ज्वेलर्सच्या शेल कंपनी मधून 30 दशलक्ष डॉलर्सची रक्कम सिंगापूर येथील बँक खात्यात जमा करण्यात आली होती. यापूर्वी सीबीआयने मैयंक मेहता यांच्या विरोधात जारी केलेले लुक आऊट परिपत्रक रद्द करण्यास विरोध केला होता.
ईडीने त्यावर आक्षेप घेतला: लूक आउट परिपत्रक रद्द करण्याच्या मैयंक मेहता यांच्या याचीकाला विरोध करत असताना सीबीआयने या व्यवहाराचा उल्लेख केला होता. मैयंक मेहता यांना एलओसी रद्द करण्याची इच्छा होती. ईडीने त्यावर आक्षेप घेतला नव्हता. परंतु सीबीआयने याला विरोध केला होते. सीबीआय युक्तीवादा दरम्यान असे म्हटले होते की, मैयंक मेहता यांना व्यवहाराशी संबंधित खात्याचे विवरण देण्यासाठी नोटीस बजावली होती.
न्यायालयाने निर्देश दिले: परंतु अनेकवेळा समज देऊनही ते सादर करू शकले नाहीत. रेकॉर्ड नसल्यामुळे त्या मैयंक मेहताची चौकशी रखडली आहे. सीबीआयने शुक्रवारी वकील ए लिमोसिन यांच्यामार्फत सिंगापूरला लेटर ऑफ रोगेटरी जारी करण्यासाठी याचिका दाखल केली. तपशील मिळविण्यासाठी अधिकृत संप्रेषण. विशेष सीबीआय न्यायाधीश एस एम मेंजोगे यांनी सुनावणीनंतर याचिका मंजूर केली आहे. सीबीआयने तपास पूर्ण केल्यानंतर एलओआर संदर्भात न्यायालयाला अहवाल सादर करावा असेही न्यायालयाने निर्देश दिले आहे.
न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर केली: बँक घोटाळ्याशी संबंधित फसवणूक आणि भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. याच फसवणुकीसंबंधी अंमलबजावणी संचालनालयाच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, मैयंक मेहता आणि त्यांची पत्नी आणि व्यावसायिकाची बहीण पुर्वी मेहता दोघांनीही याचसाठी याचिका केल्यानंतर मंजूरी दिली होती. सीबीआयच्या खटल्यात मैयंक मेहता अजूनही आरोपी आहेत. दुसर्या खटल्यातील त्यांच्या याचिकेत त्यांनी नीरव मोदी आणि त्याच्या मनी लाँड्रिंग व्यवहार आणि मालमत्तेविरुद्ध त्यांच्या माहितीतील तथ्यांचे संपूर्ण खुलासे करण्याची ऑफर दिली होती. दुसर्या विशेष न्यायालयाने त्यांची याचिका मंजूर केली होती. त्यांना त्या प्रकरणात मैयंक मेहता माफीचे साक्षीदार बनवले आहे.