ETV Bharat / state

पीएमसी बँकेने फोडले रिझर्व्ह बँकेवर खापर - suspended ex ceo joy thomas blaime on rbi

पंजाब महाराष्ट्र कॉर्पोरेशन बँकेच्या वार्षिक अहवालात अडचण आल्याने रिझर्व्ह बँकेने ६ महिन्यांसाठी या बँकेवर निर्बंध आणले आहेत.

पीएमसी निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस
author img

By

Published : Sep 27, 2019, 10:44 PM IST

मुंबई - पीएमसी बँकेवर अचानक झालेल्या या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी प्रतिक्रिया दिली. गेले ७ ते ८ वर्ष बँकेत अनियमितता होती. ही अनियमितता आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगण्याचा प्रयत्न केला. यामधून बाहेर पडण्याच्या उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करणार असतानाच रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ न देताच आर्थिक निर्बंध लादले, असा आरोप आता थॉमस यांनी केला आहे.

पीएमसी निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांची पत्रकार परिषद

हेही वाचा - म्हाडाच्या आरआर बोर्डाचे व्यवहार होणार आता ऑनलाईन

थॉमस म्हणाले, बँकेवर ओढवलेल्या परिस्थितीला मी जबाबदार असून संचालक जबाबदार नाहीत. मात्र, बँकेवर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नाची उत्तरे न देताच ते निघून गेले.
सध्या रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. खातेधारकांना आपल्या खात्यातून महिन्याला केवळ १ हजार रूपये काढता येणार आहेत. पंजाब आणि महाराष्ट्र कॉपरेटीव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमची बँक पाच राज्यात काम करत असून उलाढाल २० हजार कोटी रुपये इतकी आहे. आम्ही एचडीआयएल कंपनीला जमीन आणि इतर संपत्तीच्या बदल्यात २५०० कोटींचे कर्ज दिले आहे. बँकेकडे एचडीआयएलची संपत्ती तारण असल्याने ही रक्कम बुडाली असे म्हणजे चुकीचे असल्याचे थॉमस यांनी सांगितले.

हेही वाचा - संधिसाधू सरकारची निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांवर कारवाई - राहुल गांधी

बँकेमध्ये अनियमितता असल्याचे ७ ते ८ वर्षांपासून समोर आले. या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगून नयोजन करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ न देताच आर्थिक निर्बंध लादले. बँकेकडे कॅश असल्यानेच एक हजार रुपये काढण्याची परवानगी वाढवून दहा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. आम्हाला वेळ मिळाला असता तर ही लिमिट एक लाख झाली असती असे थॉमस म्हणाले. बँकेवर जी काही परिस्थिती ओढवली त्याबाबत बँकेच्या संचालकांना काहीही माहिती नव्हती. याला एकटा मीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही

खातेदार आणि गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित -

बँकेवर निर्बंध लादले असताना आमच्याकडे पुरेशी स्थावर मालमता आणि सुरक्षा आहे. यामुळे ठेवीदारांचे पैसे बुडणार नाहीत ते त्यांना परत मिळतील असे आश्वासन थॉमस यांनी दिले.

Intro:मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप बँकेमध्ये गेले ७ ते ८ वर्ष अनियमितता होती. ही अनियमितता आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगण्याचा प्रयत्न केला. यामधून बाहेर पडण्याच्या उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करणार असतानाच रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ न देताच आर्थिक निर्बंध लादले, असा आरोप बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी केला आहे. बँकेवर ओढवलेल्या परिस्थितीला मी जबाबदार असून त्याला संचालक जबाबदार नसल्याचे थॉमस यांनी म्हटले आहे. मात्र बँकेवर ओढवलेल्या आर्थिक परिस्थितीवर पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नाची उत्तरे न देताच ते निघून गेले. Body:पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभुमीवर बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय थॉमस यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आपली बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना आमची बँक पाच राज्यात काम करत असून आमचा टर्नओव्हर २० हजार कोटी रुपये इतका आहे. आम्ही एचडीआयएल कंपनीला जमीन आणि इतर संपत्तीच्या बदल्यात २५०० कोटींचे कर्ज दिले आहे. बँकेकडे एचडीआयएलची संपत्ती तारण असल्याने ही रक्कम बुडाली असे म्हणजे चुकीचे असल्याचे थॉमस यांनी सांगितले.

बँकेमध्ये अनियमितता असल्याचे ७ ते ८ वर्षांपासून समोर आले. या परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी आम्ही रिझर्व्ह बँकेला सांगून प्लान तयार करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र रिझर्व्ह बँकेने आम्हाला वेळ न देताच आर्थिक निर्बंध लादले. बँकेकडे कॅश असल्यानेच एक हजार रुपये काढण्याची परवानगी वाढवून दहा हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. आम्हाला वेळ मिळाला असता तर ही लिमिट एक लाख झाली असती असे थॉमस म्हणाले. बँकेवर जी काही परिस्थिती ओढवली त्याबाबत बँकेच्या संचालकांना काहीही माहिती नव्हती. याला एकटा मीच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.

खातेदार आणि गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित
बँकेवर निर्बंध लादले असताना आमच्याकडे पुरेशी स्थावर मालमता आणि सिक्युरिटीज आहेत. यामुळे ठेवीदारांचे पैसे बुडणार नाहीत ते त्यांना परत मिळतील असे आश्वासन थॉमस यांनी दिले.

video - पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना उत्तर देताना जॉय थॉमस Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.