मुंबई- पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे संचालक, एमडी, आणि एजडीआईयल कंपनीचे राकेश वाधवा व सारंग वाधवा यांना अटक केली होती. यापैकी राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी हातात बॅनर घेऊन न्यायालयाबाहेर आंदोलन केले आहे.
तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी पीएमसी बँकेचे संचालक वारीयम सिंग, बँकेचे एमडी जॉय थॉमस आणि एचडीआयएल कंपनीचे राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर आज मुंबईतील दिवाणी न्यायालयामध्ये राकेश वाधवा व सारंग वाधवा या दोन्ही आरोपींना हजर केले जाणार आहे. त्यापूर्वी पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी हातात बॅनर घेऊन न्यायालयाबाहेर आंदोलन केले आहे.
हेही वाचा- मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी करणाऱ्या तृप्ती सावंत म्हणाल्या, आता जे होईल ते मैदानात पाहू !
पीएमसी बँकेच्या ग्राहकांपैकी एक बोनीलाल ही महिला सध्या कॅन्सरने ग्रस्त आहे. तिच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्यामुळे या महिलेनेसुद्धा न्यायालयाबाहेर येऊन उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून आंदोलन केले आहे. त्याचा आढावा घेतला 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी महेश बागल यांनी.