मुंबई - तब्बल अडीच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँक खातेदारांवर बंदीची कुऱ्हाड पडलेली आहे. एचडीआयएल कंपनीचे वाधवा पिता-पुत्र व पीएमसी बँकेचे संचालक, एमडी यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्यामुळे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व ईडीकडून तपास सुरू आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेतील अनेक खातेधारकांवर संकट कोसळले आहे. काही खातेदारकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या. दिवाळीचा मोठा सण असून हाती पैसे नसल्याने अनेक खातेधारक वैतागले आहेत. तर, काही त्रस्त खातेधारकांनी दीपावलीच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या मलबार हिल येथील वर्षा बंगल्याच्या २०० मीटर अंतरावर रस्त्यावर बसून काळी दिवाळी साजरी केली आहे. आज(शुक्रवार) धनत्रयोदशी आहे. पण, घरातील धन हे घरात नसल्याचे म्हणत पीएमसीच्या बँक खाते धारकांनी आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांनी तत्काळ या आंदोलकांची समजूत काढुन त्यांना रस्त्यावरून बाजूला केले आहे. मात्र, आमचे पैसे आम्हाला दिले नाही तर, आम्ही बाजुला होणार नाही असा पवित्रा या खातेधारकांनी यावेळी घेतला होता.
हेही वाचा - मनसेचे नवनियुक्त आमदार प्रमोद पाटील यांचे शर्मिला ठाकरेंकडून औक्षण
हेही वाचा - शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली, भाजप जुमाणणार नाही - विश्लेषकांचे मत