ETV Bharat / state

Sanjay Raut On PM Modi visit : मराठी लोकांवरील अन्याय थांबवण्याची सूचना पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना करावी - संजय राऊत - मराठी लोकांवर अन्याय करु नका

संजय राऊत यांनी बेळगावमधील मराठी जनतेवर होणाऱ्या अत्याचार यावर रोखठोक मते मांडली. पंतप्रधानांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मराठी लोकांवर अन्याय करु नका अशा सूचना दिल्या पाहिजेत असे राऊत म्हणाले. मुंबईमध्ये विकास प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हातून होणार आहे. यातले प्रमुख प्रकल्प शिवसेनेच्या कार्यकाळामध्येच सुरू झाल्याचे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On PM Modi
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी सांगावे
author img

By

Published : Jan 19, 2023, 12:31 PM IST

Updated : Jan 19, 2023, 12:36 PM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांनी सांगावे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत. संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात येण्यावर एक टिप्पणी केली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये हे जाहीर करावे की बेळगावमधील मराठी भाषिक जनतेवर अत्याचार होऊ देऊ नका अशा सूचना त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. अशा अनेक विषयावर त्यांनी आज आपली मते परखडपणे मांडली.

महाविकास आघडीच्या काळातले प्रकल्प : मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांचा मान राखला गेला पाहिजे. म्हणून त्यांचे स्वागत जरूर आम्ही देखील करतो. मात्र ते ज्या प्रकल्पांचे उद्घाटन आज करणार आहेत. त्यातले प्रमुख प्रकल्प शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये होती त्यावेळचे आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळामध्येच या प्रकल्पांची सुरुवात आणि पायाभरणी झालेली आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. संजय राऊत पुढे म्हणाले की, मुंबईतल्या जनतेला देखील या संदर्भात माहिती आहे की महाविकास आघडीच्या कार्यकाळामध्ये मुंबई महानगर पालिकेने या मूलभूत प्रकल्पांची पायाभरणी केलेली होती. आता केवळ त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. महाविकास आघडीने सुरुवात केलेल्या प्रकल्पांवर आता एक प्रकारे देशाचे पंतप्रधान शिक्कामोर्तब करत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

सीमा भागात मराठी जनतेवर अत्याचार : सीमा भागातील मराठी जनतेच्या समस्यांबाबत देखील राऊत यांनी माध्यमांसमोर परखड मते व्यक्त केली. पंतप्रधान यांनी याबाबत महाराष्ट्राला सार्वजनिक मंचावरून जरूर सांगावे की, बेळगावमध्ये असलेल्या मराठी भाषिकांवर अन्याय होऊ देऊ नका. त्यांना त्रास होणार नाही, याबाबतची सर्व खबरदारी घ्या अशा सूचना मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आहेत. हे पंतप्रधानांनी आज सांगायला हवे. आपल्या महाराष्ट्रातील मराठी भावाबहिणींवर बेळगाव सीमाभाग परिसरात कसा आणि कोणता अत्याचार झाला. हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे त्या संदर्भात पुन्हा तसा अन्याय होणार नाही. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत, हे पंतप्रधानांनी जाहीर करावे.

भारत जोडो यात्रेत सहभाग : काँग्रेस असो किंवा इतर पक्ष असो अनेक मतभेद असतात. मात्र भारत जोडो यात्रा ही भारतीय जनतेच्या लोकशाही हक्कांसाठी आहे. त्यामुळे तिथे मी जाणार हे कबूल केले होते. त्याप्रमाणे आता तिथे जात आहे. तेथील जनतेचे त्यासंदर्भात काय मत आहे. जनता काय म्हणते हे देखील आम्ही पाहणार आहोत. समजून घेणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

जम्मूमध्ये शिवसेना पक्ष मजबूत : संजय राऊत पुढे म्हणाले की जम्मूमध्ये आमच्या पक्षाचे काम चांगले आहे. तेथे आता काय-काय नवीन गोष्टी करायच्या आहेत. याबद्दलचा आढावा गेल्यावर घेणार आहोत. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या काही सूचना आणि आदेश दिलेले आहेत. त्या संदर्भातली माहिती देखील तेथील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देणार आहोत.

हेही वाचा : IMA Aggressive on Sanjay Rauts : संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आयएमए आक्रमक; नंतर केली सारवासारव

Last Updated : Jan 19, 2023, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.