ETV Bharat / state

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधांनाच्या बीकेसी येथील सभेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून जय्यत तयारी सुरू - PM Modis Mumbai Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते काही महत्त्वाच्या कामांचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 15 फूट उंचीचे कटआउट देखील पाहायला मिळत आहेत. पंतप्रधानांची वांद्रे येथील बीकेसी मैदानावर सभा होणार आहेॉ.

meeting at BKC
भाजपकडून जय्यत तयारी सुरू
author img

By

Published : Jan 18, 2023, 3:19 PM IST

मुंबई : पंतप्रधानांच्या सभेची जय्यत तयारी शिंदे फडवणीस सरकारकडून करण्यात आलेली आहे. जवळपास एक लाख नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेत सामील होतील अशी आसन व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मोठा मंच तयार करण्यात आलेला आहे. केवळ ज्या मान्यवरांना स्टेजवर निमंत्रण असणार आहे, त्यांनाच स्टेजवर घेतले जाणार आहे. तर आमदार खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी स्टेजच्या समोर आसनव्यवस्था तयार करण्यात आली आहे. त्यामागे सामान्य नागरिक बसतील अशी व्यवस्था या सभेसाठी करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक या सभेसाठी येतील यासाठी खासकरून भाजपने मुंबईतील आपल्या सर्व नेतेमंडळींना आदेश दिले आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण -डोंबिवली, भिवंडी, पालघर या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक येतील यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी मुंबई उपनगर, ठाणे, भिवंडी, पालघर, वसई विरार, कल्याण ,भिवंडी या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे बीकेसी परिसरात वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था देखील नियोजित करण्यात आली आहे. प्रत्येक भागातून येणाऱ्या गाड्यांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था बीकेसीच्या आजूबाजूच्या परिसरात करण्यात आलेली आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पूर्व उपनगर या परिसरातून येणाऱ्या कार्यकर्ते आणि नेतेमंडळी यांच्या वाहनांसाठी वेगळी व्यवस्था तर पश्चिम उपनगर पालघर वसई विरार या परिसरातून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेतेमंडळींच्या वाहनांच्या पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेणेकरून सभेला येताना आणि सभा संपल्यावर जाताना ट्रॅफिकची समस्या होणार नाही. याची दक्षता पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मुंबई दौरा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सेवांचा लोकार्पण या दौऱ्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. गेली 25 वर्ष महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. यावर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्तांतर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यातच पंतप्रधान मुंबईकरांसाठी सेवेचा लोकार्पण या दौऱ्यांमध्ये करणार आहे. तसेच या दौऱ्यात होणाऱ्या सभेत पंतप्रधान मुंबईकरांसाठी अजून कोणत्या घोषणा करणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर असताना सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान घाटकोपर ते वर्सोवा अशी मेट्रो सेवा बंद राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे.

विविध विकास कामांचेही उद्घाटन : 19 जानेवारीला मुंबईत काही सेवेचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या २० दवाखान्यांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. याचबरोबर मुंबईत तीन मोठे हॉस्पिटल निर्मितीच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पार पाडणार आहेत. मुंबईतील महत्वकांशी असा प्रकल्प असलेल्या चारशे किमीच्या काँक्रीटीकरण रोडच्या कामाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडणार आहे. यासोबतच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत मुंबईतील फेरीवाल्यांना एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Mumbai Metro Service मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान मेट्रोची सेवा या वेळेत असणार बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.