ETV Bharat / state

PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा - मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई-सोलापूर व मुंबई-शिर्डी अशा या दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. या दोन्ही ट्रेनला आज(10 फेब्रुवारी) मोदींनी हिरवा झेंडा दाखवत रवाना केल्या.

pm narendra modi
नरेंद्र मोदी
author img

By

Published : Feb 10, 2023, 3:41 PM IST

Updated : Feb 10, 2023, 4:41 PM IST

पंतप्रधान मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवताना

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबई-सोलापूर व मुंबई-शिर्डी अशा या दोन वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. मुंबईतील सीएसएमटी येथून मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री देखील यावेळी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करणार - अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले असे काही लोकं म्हणतात. महाराष्ट्राला रेल्वेसाठी 13 हजार 500 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. ही रक्कम याआधी कधीच मिळाली नाही. राज्यात पहिल्यांदाच ही रक्कम रेल्वेसाठी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. रेल्वे मंत्र्यांना मनापासून धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की वंदे भारत या दोन्ही ट्रेनचा लोकार्पण करण्यासाठी स्वतः पंतप्रधान मोदी मुंबईत उपस्थित राहिले, असेही शिंदे म्हणाले.

अर्थसंकल्पामुळे राज्याला फायदा - शिंदे पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने आम जनतेचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते झाले. लाखो लोकं या महामार्गाचा फायदा घेत आहेत. मेट्रो ट्रेनचे उद्घाटनपण तुमच्या हस्ते झाले. त्याचाही लाखो लोक फायदा घेणार आहेत. यापुढेही विविध प्रकल्प आहेत त्याचाही शुभारंभ तुमच्या हस्ते व्हावा यासाठी मी वाट पाहत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भरपूर फायदा झाला आहे व यापुढेही तसा सहयोग असावा. आम्ही खूप मेहनतीने व मनापासून काम करू. तुमचे जे स्वप्न आहे तीन ट्रिलियन डॉलर इकॉनोमी ते पूर्ण करण्याबरोबरच महाराष्ट्रातून एक ट्रिलियन डॉलर इकॉनोमी उभी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.

वंदे भारतचे दर जाहीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (10 फेब्रुवारी) मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.तसेच आता मध्य रेल्वेने मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दरसुद्धा जाहीर केले आहेत. सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत ट्रेनमध्ये कॅटरिंग सेवेशिवाय चेअर कारसाठी 1,000 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी 2,015 रुपये दर असेल तर कॅटरिंगसह सेकंड क्लासचे भाडे अनुक्रमे 1,300 आणि 2,365 रुपये असेल. मध्यरेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसlचे भाडे : मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस 343 किलोमीटरचा प्रवास 5 तास आणि 25 मिनिटात पूर्ण करू शकते. भारतातील सर्वात संरक्षक मंदिर शहरे आणि नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि शनी शिंगणापूर येथील इतर तीर्थक्षेत्रे पूर्ण करण्यासाठी, सध्या 7 तास 55 मिनिटे वेळ लागतो. सुमारे दोन तासांचा वेळ कमी होणार आहे. वंदे भारत सेवा दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डूवाडी स्थानकांवरील थांब्यांसह 6 तासात सेवा पूर्ण करेल. सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सीएसएमटीहून दुपारी 4.05 वाजता सुटून रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. तर सोलापूरहून सकाळी 6.05 वाजता सुटून दुपारी 12.35 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ती बुधवारी सीएसएमटी आणि गुरुवारी सोलापूरहून धावणार नाही.

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचे भाडे : सीएसएमटी ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेससाठी केटरिंग सेवेशिवाय एकेरी प्रवासाचे तिकीट चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी अनुक्रमे 840 रुपये आणि 1670 रुपये आहे. तर केटरिंग सेवेसह तिकीट दर अनुक्रमे 975 रुपये आणि 1840 रुपये आहे असेही ते म्हणाले. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस देशाची आर्थिक राजधानी आणि सोलापूर दरम्यानचे 455 किलोमीटरचे अंतर 6 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. यामुळे दोन्ही शहरांमधील संपर्क सुधारेल आणि महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुकर होईल. सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुणे जिल्ह्यातील आळंदी या धार्मिक स्थळांवरून वंदे भारत ट्रेन जाते.

हेही वाचा : Adani vs Hindenburg: हिंडेनबर्गला अमेरिकेच्या कोर्टात खेचणार.. अदानींचा कायदेशीर लढा सुरू.. वकिलांची फौज लावली कामाला

Last Updated : Feb 10, 2023, 4:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.