ETV Bharat / state

PM Modi Mann ki baat : मन की बातचा आज शंभरावा भाग; मुंबईतून अमित शाह सहभागी - मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बातमधून संवाद साधत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' रेडिओ संबोधनाच्या 100 व्या भागाच्या थेट प्रक्षेपणासाठी येथे उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

PM Modi Mann ki baat
मुंबईतून अमित शाह सहभागी
author img

By

Published : Apr 30, 2023, 9:27 AM IST

Updated : Apr 30, 2023, 12:59 PM IST

मुंबईत 'मन की बात' कार्यक्रम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ' मन की बात' कार्यक्रमाच्या १०० व्या भागासाठी मुंबई भाजपाच्या वतीने मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजाराहून अधिक ठिकाणी 'मन की बात' कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात 'मन की बात' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. तसेच राजभवन येथे सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाहंसोबत शिंदे - फडणवीस सहभागी : नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून गेली ९ वर्षे त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली. त्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा १०० वा भाग बघण्या व ऐकण्यासाठी मुंबईमध्ये भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईत खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकारी मुंबईत विविध ठिकाणी आपापल्या विभागातील कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुंबईतील डहाणूकर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व असंख्य जनतेसोबत 'मन की बात' हा कार्यक्रम अनुभवला. अमित शाह हे मुंबईत आल्याने या कार्यक्रमाविषयी मुंबईभर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

'मन की बात' चे असे झाले कार्यक्रम : भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व ३६ विधानसभेत प्रत्येकी १०० कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. पर्यटन मंत्री, मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. तसेच मागाठाणे विधानसभेत घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृह उद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लिम महिला, रिक्षाचालक यांना कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. भाजप नेते, आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते या सर्व कामगार वर्गाचा गौरव करण्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांनी मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण पाहिले. दहिसर विधानसभेत आमदार मनीषाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी भाजप मुंबई युवा मोर्चातर्फे नवीन युवा मतदारांना खास आमंत्रित करण्यात आले होते.

मुंबईभर कार्यक्रम : याप्रसंगी भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने ५० चहाच्या स्टॉलवर मोफत चहा वितरण करण्यात येणार आले. तसेच अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने शीर खुर्माचा बेत करत प्रमुख दर्गा, मदरसा आणि उर्दू शाळांमध्ये सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा लीगल सेलतर्फे वकिल बांधवांसाठी ईशान्य मुंबईत विशेष कार्यक्रम पार पडला. पश्चिम महाराष्ट्र आघाडीकडून खास मुंबईतील डबेवाल्यांसाठी सुद्धा कार्यक्रम पार पडला. दक्षिण भारतीय सेलने वरळीतील महिलांसाठी विशेष कार्यक्रम आखला होता. उत्तराखंड सेलकडून २०० नागरिक पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र दालनात कामगार आघाडीचा विशेष कार्यक्रम झाला.

हेही वाचा : Mann ki baat News : पंतप्रधान मोदी आज आज शंभराव्या मन की बातमधून साधणार संवाद, संयुक्तर राष्ट्रसंघासह देशभरात होणार प्रक्षेपित

Last Updated : Apr 30, 2023, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.