ETV Bharat / state

गल्लीतल्या रेल्वे स्थानकांचं उद्घाटनसुद्धा आता पंतप्रधान करतायेत; अरविंद सावंतांचा टोला

Arvind Sawant Taunt: भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते संपन्न झालं. (Sagari Setu Inauguration) या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थानिक ठाकरे गटाचे खासदार, आमदाराचं नाव नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. गल्लीतल्या रेल्वे स्थानकांचंसुद्धा उद्‌घाटन आता पंतप्रधान करत असल्याचं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

PM Modi
अरविंद सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 10:38 PM IST

खासदार अरविंद सावंत शिंदे गट आणि पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर टीका करताना

मुंबई Arvind Sawant Taunt: आम्ही वारंवार सांगत आहे, देशाच्या संविधानावर हल्ला होत आहे. देशाच्या घटनेवरच हल्ला करणारे लोक प्रोटोकॉल काय सांभाळणार? राज शिष्टाचार काय असतो? मी आणि राजन विचारे यांना बोलवायला पाहिजे होतं, निमंत्रण पत्रिकेत नाव टाकायला पाहिजे होतं. (MP Arvind Sawant) मी आदित्य ठाकरे यांच्यासोबत ट्रान्स हार्बर लाइनवर चालत गेलो होतो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही चालत गेलेले होते. पाठपुरावा देखील केला होता. राजन विचारे यांनीसुद्धा दिघा स्टेशन व्हावं यासाठी काम केल. त्यांचंसुद्धा नाव नाही. आज उद्घाटन होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे. हे निमंत्रम अर्धा पाऊण तास पूर्वी मिळालं आहे. आम्ही गेलो असतो तर त्यांना ते खुपलं असत. सर्व मिंदेना निमंत्रण मात्र खंद्यांना नाही असं म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात काल विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला. न्याय दिला का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ही तर प्रोटोकॉल तोडण्याची कामं: लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेत मिंध्यांच्या गुलामांची नावं असल्याचं म्हणत अरविंद सावंत यांनी बारणे यांना टोला लावला आहे. आता तटकरे, बारणे हे त्यांच्या सोबत आहेत त्यांना निमंत्रण येणार, त्यांचं नाव असणार. गुलामांचं राज्य, लाचारांचं राज्य आहे. हा प्रकल्पही माझ्या मतदार संघात आहे. तसाच कोस्टल रोडसुद्धा माझ्या मतदार संघात येतो. निमंत्रण येणार की नाही माहीत नाही. गल्लीतल्या रेल्वे स्थानकांचंसुद्धा उद्‌घाटन आता पंतप्रधान करत असल्याचं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खूप काम आहे. त्यांचंसुद्धा याच्यात नाव नाही. प्रोटोकॉल तोडण्याची कामं ते करतात.

आम्ही म्हटलो आणि मांजर आडवं गेलं: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 22 तारखेला काळाराम मंदिरला जाऊन आरती करू असे जाहीर केले होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आला होता. मात्र, त्याचात कुठेही काळाराम मंदिर बाबतचा उल्लेख नव्हता. आम्ही म्हटलो आणि मांजर आडवं गेलं आणि हे गेले काळाराम मंदिरला, असं बोलत खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधलाय.

हेही वाचा:

  1. मुंबईतील अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
  2. सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींचं युवकांना आवाहन
  3. मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची, जरांगेंच्या आंदोलना संदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टाचं मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.