ETV Bharat / state

वर्ष उलटूनही पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही, मुंबईत प्लास्टिकचा खुलेआम वापर

author img

By

Published : Sep 15, 2019, 9:08 PM IST

राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकॉलवर बंदी आणून एक वर्ष उलटले. तरीही राज्यात पूर्णपणे प्लास्टिकबंदी झालेली नाही. कारण, राज्यात जरी प्लास्टिक वापरावर बंदी असली तरी इतर राज्यातून प्लास्टिक आयात केले जाते.

उघडपणे दिसणारे प्लास्टिक

मुंबई - राज्य सरकारने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेद्वारे करण्यात आली होती. दुकानदारांवर कारवाई करून दंडही वसूल करण्यात आला. बंदी लागू होऊन एक वर्षाचा कालावधी उलटले. तरीही आज प्लास्टिक सर्रास उपलब्ध होत असल्याने खरोखरच प्लास्टिक बंदी झाली आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने ही बंदी १०० टक्के लागू करणे शक्य होणार आहे.

पूर्णपणे प्लास्टिक बंदी नाही

प्लास्टिक हे सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले होते. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून त्या कचऱ्यात टाकल्याने प्रदूषणात वाढ होत होती. मुंबईत दररोज ९ हजार ५०० टन कचरा जमा होत होता. पालिकेने गेल्या २ वर्षांत या कचऱ्याचे प्रमाण ७ हजार टन पर्यंत कमी केले आहे. यात १४ टक्के सुका कचरा असतो. त्यामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्या ६ टक्के इतका असतो. राज्य सरकारने वर्ष भरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली.

हेही वाचा - 'आरेसाठी भिडवूया रे, आवाज गगनाला'...

मुंबईत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. गेल्या वर्षभराच्या काळात पालिकेने १२ लाखांहून अधिक दुकानांवर कारवाई करत ७५ हजार टन प्लास्टिक जप्त केले. त्यातून ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून दंड न भरणाऱ्या ५९९ दुकानदारांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मॉल, दुकानामधून प्लास्टिक विक्री बंद झाली आहे. मात्र, शेजारील राज्यांमधून सर्रास प्लास्टिक पिशव्या फेरीवाल्यांना मिळत असल्याने आजही प्लास्टिक बंदीची अंमलबाजवणी १०० टक्के करता आलेली नाही.

हेही वाचा - किर्तीकर म्हणातात 'आरे ' जंगल नाही, मग आदित्य ठाकरेंचा वृक्षतोडीला विरोध का?- शर्मिला ठाकरे

मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे परराज्यातून येणारे प्लास्टिकही बंद होणार असल्याने बंदीची १०० टक्के अंमलबजावणी करणे शक्य आहे.

मुंबईत ४०८ टन प्लास्टिकचा कचरा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार देशात दररोज तब्बल २५ हजार ९४० टन प्लास्टिक कचरा जमा होत असून, प्लास्टिक कचरानिर्मितीमध्ये मुंबईचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश होता. देशातील प्रमुख ६० शहरांमध्ये दररोज तब्बल ४ हजार ५९ टन प्लास्टिक कचरा तयार होतो. देशात प्लास्टिक कचरा निर्मितीमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत दररोज ४०८ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० टक्के कचरा उचलला जात नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आहे.

३ लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड

प्लास्टिक महाराष्ट्रात ५ हजार दुकाने आणि १५ हजार फेरीवाले आहेत. तर ६० हजार लोक या व्यापाराशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे हा व्यापार चालवण्यासाठी विविध बँकांमधून १३ हजार कोटी रुपये कर्ज घेतले आहे. प्लास्टिक बंदी केल्यास हे कर्ज कसे फेडले जाणार ? तसेच प्लास्टिक बंदीमुळे ३ लाख लोक बेरोजगार होणार आहेत. या ३ लाख बेरोजगारांचे काय होणार? असा प्रश्न प्लास्टिक बंदीमुळे उपस्थित झाला आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरून विशेषकरून गुजरातमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या राज्यात येत आहेत. यावर आळा घालता येत नसल्याने प्लास्टिक बंदी सध्यातरी १०० टक्के यशस्वी होऊ शकत नाही.

बंदी यशस्वी झाली का याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे

मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी लागू केली. मात्र, त्यानंतर फेरीवाले आणि दुकानदाराकडे आजही प्लास्टिक पिशव्या सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे प्लास्टिक बंदी यशस्वी झाली का याकडे पालिका आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

प्रभावी अंमलबजावणीची गरज

मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनूसार प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षभरात प्लास्टिकच्या कचरा कमी झाला. प्लास्टिक बंदी ८० टक्के यशस्वी झाली असून त्यांची आणखी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे असे, सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे.

Intro:साठे सरांनी सांगितल्या प्रमाणे विशेष बातमी

मुंबई - राज्य सरकारने वर्षभरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली. त्याची अंमलबजावणी मुंबईत महापालिकेद्वारे करण्यात आली. दुकानदारांवर कारवाई करून दंडही वसूल करण्यात आला. बंदी लागू होऊन एक वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर आजही प्लास्टिक सर्रास उपलब्ध होत असल्याने खरोखरच प्लास्टिक बंदी झाली आहे का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने ही बंदी १०० टक्के लागू करणे शक्य होणार आहे.
Body:प्लास्टिक हे सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले होते. विघटन न होणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून त्या कचऱ्यात टाकल्याने प्रदूषणात वाढ होत होती. मुंबईत रोज ९५०० टन कचरा जमा होत होता. पालिकेने गेल्या दोन वर्षात हे कचऱ्याचे प्रमाण ७ हजार टन पर्यंत कमी केले आहे. यात १४ टक्के सुका कचरा असतो. त्यात प्लास्टिकचा कचरा ६ टक्के इतका असतो. राज्य सरकारने वर्ष भरापूर्वी प्लास्टिक बंदी लागू केली.

मुंबईत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. गेल्या वर्षभराच्या काळात पालिकेने १२ लाखाहून अधिक दुकानांना भेटी देऊन ७५ हजार टन प्लास्टिक जप्त केले आहे. ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून दंड न भरणाऱ्या ५९९ दुकानदारांवर कोर्टात केसेस दाखल केल्या आहेत. यामुळे मॉल, दुकानामधून प्लास्टिक विक्री बंद झाली आहे. मात्र बाजूच्या राज्यांमधून सर्रास प्लास्टिक पिशव्या फेरीवाल्यांना मिळत असल्याने आजही प्लास्टिक बंदीची अंमलबाजवणी १०० टक्के करता आलेली नाही.

मागील वर्षी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली. मुंबईत याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात आहे. या वर्षभराच्या काळात पालिकेने १२ लाखाहून अधिक दुकानांना भेटी देऊन ७५ हजार टन प्लास्टिक जप्त केले आहे. ४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असून दंड न भरणाऱ्या ५९९ दुकानदारांवर कोर्टात केसेस दाखल केल्या आहेत. यामुळे मॉल, दुकानामधून प्लास्टिक विक्री बंद झाली आहे. मात्र बाजूच्या राज्यांमधून सर्रास प्लास्टिक पिशव्या फेरीवाल्यांना मिळत असल्याने आजही प्लास्टिक बंदीची अंमलबाजवणी १०० टक्के करता आलेली नाही. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात प्लास्टिक बंदी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे परराज्यातून येणारे प्लास्टिक बंद होणार असल्याने बंदीची १०० टक्के अंमलबजावणी करणे शक्य आहे.

मुंबईत ४०८ टन प्लास्टिकचा कचरा -
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अहवालानुसार देशात दररोज तब्बल २५ हजार ९४० टन प्लास्टिक कचरा जमा होत असून, प्लास्टिक कचरानिर्मितीमध्ये मुंबईचा पहिल्या दहा शहरांमध्ये समावेश होता. देशातील प्रमुख ६० शहरांमध्ये दररोज तब्बल ४ हजार ५९ टन प्लास्टिक कचरा तयार होतो. देशात प्लास्टिक कचरा निर्मितीमध्ये मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत रोज ४०८ टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. धक्कादायक बाब म्हणजे यातील ४० टक्के कचरा उचलला जात नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आहे.

३ लाख लोकांवर बेकारीची कुऱ्हाड -
प्लास्टिक महाराष्ट्रात ५ हजार दुकाने आणि १५ हजार फेरीवाले आहेत. तर ६० हजार लोक या व्यापाराशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे हा व्यापार चालवण्यासाठी विविध बँकांमधून 13 हजार कोटी रुपये कर्ज घेतले आहे. प्लास्टिक बंदी केल्यास हे कर्ज कसे फेडले जाणार ? तसेच प्लास्टिक बंदी मुळे ३ लाख लोक बेरोजगार होणार आहेत. या ३ लाख बेरोजगारांचे काय होणार ? असा प्रश्न प्लास्टिक बंदीमुळे उपस्थित झाला आहे. तसेच महाराष्ट्राबाहेरून विशेषकरून गुजरातमधून प्लॅस्टिकच्या पिशव्या राज्यात येत आहेत. यावर आळा घालता येत नसल्याने प्लास्टिक बंदी सध्यातरी १०० टक्के यशस्वी होऊ शकत नाही.

बाईट्स
बंदी यशस्वी झाली का याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे -
मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी लागू केली. मात्र त्यानंतर फेरीवाले आणि दुकानदाराकडे आजही प्लास्टिक पिशव्या सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे प्लास्टिक बंदी यशस्वी झाली का याकडे पालिका आयुक्तांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली आहे.

प्रभावी अंमलबजावणीची गरज -
मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या सुचनेनुसार प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षभरात प्लास्टिकच्या कचरा कमी झाला. प्लास्टिक बंदी ८० टक्के यशस्वी झाली असून त्यांची आणखी प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे असे सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हटले आहे.

बातमीसाठी vis
शिवसेना नगरसेविका सुजाता सानप व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांची बाईट..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.