मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, क्रॉफर्ड मार्केट मुंबई महानगरपालिकेकडून हलवण्यात येणार आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्वी याचिकाकर्त्याने चार आठवड्यांच्या आत 2 लाख 50 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश मुख्य प्रभारी न्यायमूर्ती संजय व्ही गंगापूरवाला, न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या खंडपीठाने दिले आहे.
नुकसान होण्याचा याचिकेत दावा : प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही गंगापूरवाला, न्यायमूर्ती संदीप व्ही मारणे यांच्या खंडपीठासमोर याचिकाकरते लहू कोंडिबा गुंड यांनी जनहित याचिका दाखल केली होती. स्वतःला सार्वजनिक उत्साही व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला होता. वकील राजीव नरुल, वकील एम ए खान यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती. या मार्केटमध्ये फळे, भाजीपाला विकले जात असते. या ठिकाणावरून सदर मार्केट स्थलांतर केल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे याचिकेत म्हटले होते.
खंडपीठाने दिले निर्देश : याचिकाकर्त्याला जनहित याचिका पुढे चालवायची आहे. याचिकाकर्त्याची सत्यता तपासण्यासाठी सुरक्षा म्हणून याचिकाकर्त्यावर खर्च लादल्यास, मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका नियम 2010 च्या नियम 7A नुसार याचिकाकर्त्याने चार आठवड्यांच्या आत 2 लाख 50 हजार रुपये जमा करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहे.
इमारतीची पुनर्बांधणी : दक्षिण मुंबईतील एका इमारतीत घाऊक मासळी बाजार चालवल्याबद्दल हायकोर्टाने जुलै 2021 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ताशेरे ओढले होते. नागरी संस्थेने स्थलांतरित करण्यासाठी कारवाईची योजना सादर केली होती. बीएमसीने सांगितले होते की, महात्मा ज्योतिबा फुले मार्केट, क्रॉफर्ड मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मासळी मार्केटमध्ये कोणत्याही व्यापाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. ही इमारत पाडून पुनर्बांधणी करायची आहे असे कारण त्यांना दिले होते. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका मासळी व्यापाऱ्याच्या याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर बीएमसीने हे सादरीकरण केले होते.