मुंबई - काँग्रेस सोडून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गळ्यात मंत्री मंडळ विस्तारात गृहनिर्माण मंत्रिपदाची माळ पडली. मात्र, त्यांच्या मंत्रीपदाच्या विरोधात ज्येष्ठ वकील अॅड. सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या विधिमंडळातील कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांची मंत्रीपदावर निवड होणे हे घटनेविरुद्ध आहे. एखाद्या व्यक्तीचा अपवाद वगळता कोणालाही मंत्री करता येत नाही. दुसऱ्या पक्षातील मातब्बर नेत्यांना प्रलोभन देऊन आपल्या पक्षात घेणे आणि त्यांना मंत्री बनवणे ही काही अपवादात्मक परिस्थिती नाही. अशा प्रकरणात संबंधीत व्यक्ती ६ महिन्यात निवडून यावी लागते. मग आता निवडणूकच होणार नसेल तर मग हा केवळ राजकीय भ्रष्टाचार असल्याचे अॅड. सतीश तळेकर म्हणाले.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी पाहा आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्याशी केलेली बातचित, क्लिक करा