ETV Bharat / state

'आरे'तील आंदोलनकर्त्यांना अखेर मिळाला जामीन - 19 civilians arrested in aarey

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड येथील झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी आरे परिसरात आंदोलन केले होते. यातील २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. यासर्वांना अखेर काल दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

आरेतील आंदोलनकर्त्यांना मिळाला जामीन
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:47 AM IST

मुंबई - आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड येथील झाडे वाचविण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी शुक्रवारी आरे परिसरात आंदोलन केले होते. यातील २९ जणांना पोलिसांनी अटक केली होती. यासर्वांना अखेर काल दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अटक करण्यात आलेल्या मुलांच्या नातेवाईकांची गोरेगाव येथे पत्रकार परिषदेत जामिनाची माहिती दिली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

प्रतिक्रिया देताना अटक करण्यात आलेली मुले व त्यांचे नातेवाईक

एकीकडे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते, तर मनात दुसरीकडे झाड वाचविण्यासाठी आपल्या नातेवाईकांना जेलमध्ये जावे लागल्याचे दुःखही झळकत होते. पत्रकार परिषदेत अटक झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सरकार व पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला.

अटक करण्यात आलेले व त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

ऋषिकेश नंदकुमार पाटील

कोणतंही अनाधिकृत काम करत नसताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. बायका मुलींची देखील गय केली नाही. पोलिसांनी आमच्यावर केलेला आरोप चुकीचा आहे. भारतात पर्यावरणाचा नाश होतो आहे. त्यावर आवाज उठवणे हा गुन्हा झाला का?

प्रकाश भोईर

पर्यावरण वाचवा हे शिकवले गेले. तेच करण्यासाठी आम्ही गेलो होतो. झाड तोडणे गुन्हा आहे. त्याऐवजी झाड वाचवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला गेला. त्या झाडांवर राहणाऱ्यांचा जीव देखील गेला, त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी भोईर यांनी केली. आमच्या पूर्वजांकडून जमिनी घेऊन प्रसाद वाटतात तसे सर्व संस्थांना जमिनी दिल्या गेल्या. आमच्या पूर्वजनांना माहीत असते तर त्यांनी जमिनी दिल्याच नसत्या. माझ्या बायकोने झाड वाचवले हा गुन्हा केला, तर मला तिचा अभिमान वाटतो. आता एखाद्या रोपट्याने प्रश्न केले की, मला लावल्यावर झाड शेवटपर्यंत वाचेल का, तर त्याला उत्तर काय देऊ, अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली.

मनीषा धिंडे

झाड तोडत असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी आम्ही तिथे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आम्हाला अडवले. आम्ही तिथेच बसून घोषणा दिल्या. लोकांचा राग अनावर झाला आणि ते बॅरिकेड तोडून आत गेले. मला पुरुष पोलिसांनी धक्का मारून बाहेर काढले. आम्हाला बाहेर नेऊन दहिसर पोलीस ठाण्यात नेले.

परीक्षेला जात असताना दुसऱ्यांदा पुन्हा मला आरे चेकनाका येथे पुरुष पोलिसांनी हात पकडून आरे पोलीस ठाण्यात आणले. प्राध्यपकांनी विनंती केल्यावर मला परीक्षेसाठी सोडण्यात आले. झाड वाचविण्यासाठी या सर्व त्रासाला सामोरे जावे लागल्याचे मनीषा म्हणाली.

रिद्धी अंगवणे

माझा भाऊ सिद्धार्थ याला आरे कंझर्व्हेशन ग्रुपमधून झाड तोडत असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. झाडे लावा झाडे जगवा ही शिकवण शाळेत दिली. मग झाड तोडत असाल तर अभ्यासक्रमातून झाडे लावा ही शिकवण काढून टाका. हुकूमशाही असल्याचे आताच्या सरकारने सिद्ध केल आहे.

विद्या पोतदार, पीएचडी, विरार

माझा मुलगा दिव्यांक स्वत:चा विचार न करता समाजाचा विचार करणारा आहे. संविधानाने दिलेले हक्क तो आंदोलनच्या रूपाने बजावत होता. गाण्याच्या माध्यमातून तो विरोध करत होता. सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्याचा फेरविचार करावा आणि सरकारने चूक कबूल करावी, असे म्हणत दिव्यांक पोतदार या तरुणाची आई विद्या पोतदार यांनी सरकारचा निषेध केला.

हेही वाचा- लग्न जमलेल्या प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तर्क वितर्कांना उधाण..

Intro:मुंबई - आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड येथील झाडं वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या 29 नागरिकांना अखेर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अटक करण्यात आलेल्या नातेवाईकांची गोरेगाव येथे पत्रकार परिषद सुरु असताना ही जामीनाची माहिती आली आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. एकीकडे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते तर मनात दुसरीकडे झाड वाचवण्यासाठी आपल्या नातेवाईकांना जेलमध्ये जावं लागल्याचं दुःख ही झळकत होतं. आजच्या पत्रकार परिषदेत अटक झालेल्या नागरीकांच्या नातेवाईकांनी सरकार व पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला.
त्यांच्या प्रतिक्रिया ...Body:ऋषिकेश नंदकुमार पाटील
कोणतंही अनधिकृत काम करत नसताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. बायका मुलींशी गय केली नाही. पोलिसांनी आमच्यावर केलेला आरोप चुकीचा आहे. भारतात पर्यावरणाचा नाश होतोय त्यावर आवाज उठवण हा गुन्हा झाला आहे का?

प्रकाश भोईर
- पर्यावरण वाचवा हे शिकवलं गेलं तेच करण्यासाठी आम्ही गेलो होतो. झाड तोडण गुन्हा आहे, त्याऐवजी झाड वाचवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला गेला. त्या झाडांवर राहणाऱ्या जीव देखील गेला, त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी भोईर यांनी केली. आमच्या पूर्वजांकडून जमिनी घेऊन प्रसाद वाटतात तस सर्व संस्थांना जमिनी दिल्या गेल्या, आमच्या पूर्वजनांना माहीत असत तर त्यांनी जमिनी दिल्याचं नसत्या. माझ्या बायकोने झाड वाचवलं हा गुन्हा केला, तर मला तिचा अभिमान वाटतो. आता एखादया रोपट्याने प्रश्न केलं की मला लावल्यावर झाड शेवटपर्यंत वाचेल का तर त्याला उत्तर काय देऊ अशी खंत भोईर यांनी व्यक्त केली.

मनीषा धिंडे, जीवाचा पाडा
झाड तोडत असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी आम्ही तिथे धाव घेतली. मात्र पोलिसांनी आम्हाला अडवलं, आम्ही तिथेच बसून घोषणा दिल्या. लोकांचा राग अनावर झाला आणि ब्यारीकेट तोडुन आत गेलो. मला पुरुष पोलिसांनी धक्का मारून बाहेर काढलं. आम्हाला बाहेर नेऊन दहिसर पोलीस ठाण्यात नेलं.
परीक्षेला जात असताना दुसऱ्यांदा पुन्हा मला आरे चेकनाका येथे पुरुष पोलिसांनी मला हात पकडून आरे पोलीस ठाण्यात आणलं.प्राध्यापकांनी विनंती केल्यावर मला परीक्षेसाठी सोडलं. झाड वाचवण्यासाठी या सर्व त्रासाला सामोरे जावं लागल्याचं मनीषा म्हणाली.

रिद्धी अंगवणे
माझा भाऊ सिद्धार्थ याला आरे कँझर्व्हेशन ग्रुप मधून झाड तोडत असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. झाडे लावा झाडे जगवा ही शिकवण शाळेत दिली, मग झाड तोडत असाल तर अभ्यासक्रमातून झाडं लावा ही शिकवण काढून टाका. हुकूमशाही असल्याचं आताच्या सरकारनं सिद्ध केल आहे.

विद्या पोतदार पीएचडी विरार
माझा मुलगा दिव्यांक स्वतःच विचार न करता समाजाचा विचार करणारा आहे. संविधानाने दिलेलं हक्क तो आंदोलनच्या रूपाने बजावत होता.
गाण्याच्या माध्यमातून तो विरोध करत होता.
सरकारने दाखल केलेल्या गुन्ह्याचा फेरविचार करावा आणि सरकारने चूक कबूल करावी असे म्हणत दिव्यांक पोतदार या तरुणाच्या आई विद्या यांनी सरकारचा निषेध केला.
Conclusion:बाईट
ऋषिकेश पाटील
स्टॅलिन वनशक्ती संस्था
मनीषा धिंडे
प्रकाश भोईर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.