ETV Bharat / state

कोरोना विषाणूमुळे जनतेने‍‍ घाबरून जाऊ नये - राजेश टोपे - कोरोना महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. प्रत्येकाने स्वत:ची स्वच्छता राखावी. उपचारापेक्षा प्राथमिक काळजी घेणे केव्हाही चांगले असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

rajesh tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Mar 4, 2020, 11:52 PM IST

मुंबई - चीनसारख्या देशात ज्यांना कोरानाची बाधा झाली होती, त्यांच्यापैकी केवळ दोन टक्के लोकांचाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये, राज्यात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास आपण सर्वांनी त्यासाठीची दक्षता घ्यावी, असे अवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

तसेच राज्यात अजूनही एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, तरीही खबरदारी म्हणून सरकारकडून सर्व प्रकारच्या उपयायोजना केल्या जात असल्याची माहिती आज विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेत आज कोरोनावर दोन तासांहू‍न अधिक वेळ चर्चा झाली. तब्बल १४ विधान परिषद सदस्य आणि उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कोरोनाविषयी चिंता व्यक्त करत त्यासाठी उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. यावरील उत्तरात टोपे यांनी कोरोनाविषयी जनतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले. या विषाणूची खोकला, सर्दी ताप येणे अंग दुखणे ही लक्षणे आहेत. गंभीर स्वरूप या आजाराने केले तर यातून निमोनिया आणि किडनी फेल होते. त्यातून रुग्ण दगावतो. कोणताही विषाणू शरीरात आला तर त्यातून आपल्या शरीरात ते नष्ट करण्याचे काम केले जाते. परंतु, ते नष्ट करताना दहा दिवस लागतो. नंतरच्या परिणामाला तीन चार दिवसातही कव्हर करता येतो. उपचार कसा केला पाहिजे, यात प्रतिकार शक्ती महत्त्वाचा भाग आहे. जेवढी प्रतिकार शक्ती आपण वाढवू तेवढा हा रोग बरा होतो, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

सर्वांना मास्क वापरण्याची गरज नाही -

सर्वांनीच मास्क वापरण्याची गरज नाही, मात्र ज्यांना बाधा झाली आहे, व त्यांच्या संपर्कातील लोक आहेत, त्यांनी वापरावे, इतरांनी आपल्यासोबत स्वच्छ रुमाल वापरावा. आपल्याकडे एन-९३ रुग्णालयातील लोकांसाठी आहे. तसेच ट्रीपल लेअरचाही मास्क जनतेनी वापरण्याची गरज नाही. वाटलेच तर साधे मास्क वापरावेत, हँडशेक टाळावे, नमस्कार करावेत आणि सर्वांनी मिळून एकदिलाने कोरोना व्हायरसच्या विरोधात काम करण्यासाठी पुढे यावे असेही टोपे यांनी आवाहन केले.

उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही -

बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांचे आम्ही १०० टक्के स्क्रीनींग आणि थर्मट टेस्ट करत आहोत. त्यात काही लक्षणे आढळल्यास ऐसोलेटेड वार्डमध्ये पाठवतो. मुंबईत कुर्ला, घाटकोपर, आदी ठिकाणी हे वार्ड आहेत, त्यांना या वार्डमध्ये ठेवले जात आहे, त्यांना २८ दिवसांपर्यंत ठेवतो. राज्यात खबरबारी म्हणून सर्व जिल्हा रुग्णालयात दहा बेड या ऐसोलेटेड वार्ड करण्याचे आदेश दिले आहेत, प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहोत. सगळे तज्ज्ञ आपण घेणार आहोत यासाठी खासगी रुग्णालयाची मदत घेणार आहोत. पीपीई , एन ९५ हा जो मास्क आहे, त्यापेक्षा अधिकचे मास्क खरेदी करून ठेवलेले आहेत, ट्रीपल लेअर मास्क आपल्याकडे आहेत, निधीच्या संदर्भात कोणत्याही परिस्थितीत कमतरता पडणार नाही. माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन केले जाईल. विविध माध्यमांचा वापर केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिनेमागृहात प्राईम टाईमध्येही आपण यासाठीच्या सूचना दिल्या आहेत अशी माहितीही टोपे यांनी दिली.

सोशल मीडियावरील अफवांवर सायबर क्राईमकडून कारवाई

सोशल मीडियाचा गैरवापर करत जे लोक अफवा पसरवत आहेत, त्यासाठी सायबर क्राईमकडून त्यांच्या रूटपर्यंत जाऊन गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात ज्या काही विशिष्ट लॅब आहेत, त्यासाठी नागपूरला आणि मुंबईत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला लॅब करणे शक्य नाही. मात्र, आमदारांना तज्ज्ञाचे मार्गदर्शन करण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वीच आयोजित केले जाईल. टोल फ्री १०४ निर्माण केले आहे, तसेच टोल फ्री व्यवस्था केली आहे. मास्कची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सर्व कायद्यांचा वापर केला जाईल, असे आश्वासनही टोपे यांनी दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.