ETV Bharat / state

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करा - मुंबई कोरोना बातमी

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यासाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्यास मुभा आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या खासगी कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल रेल्वे
लोकल रेल्वे
author img

By

Published : Jul 1, 2021, 10:45 PM IST

मुंबई - मागील दोन महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी आज अनेक नागरिक विनातिकिट प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा लोकल प्रवासात कडक निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक खासगी वाहनातून प्रवास करत असल्याने आर्थिक फटका बसत आहे. या खर्चाची बचत होण्यासाठी लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्याने लोकल प्रवास खुला करण्याची मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.

सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड

'ब्रेक द चेन' अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील, वैद्यकीय सेवेतील, रुग्ण, दिव्यांग यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आता निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने अनेक नागरिक आता कार्यलय जाणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लोकल प्रवासात मुभा नसली तरी अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात नागरिक लोकलने प्रवास करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगोदरच पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे कमी पगार असणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्च ही पेलवेना झाला आहे. कारण, मुंबईत कामाला येणारे अनेक नागरिक कल्याण-कसारा, कर्जत, खोपोली, वसई-विरार, नालासोपारा या भागातून येतात. मात्र, इंधन दरवाढीमुळे रस्ते मार्गाने मुंबई गाठणे खिशाला परवडणारे नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली जात आहे.

लोकल प्रवास खुला करा

उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, एकीकडे कोरोना रूग्ण कमी होत असताना पुन्हा तिसरी लाट येईल, अशी नागरिकांना भीती दाखवण्यात येत आहे. आता अनेक क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे लोकल प्रवास करण्यासाठी नागरिकांना मुभा देणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याला लोकल प्रवासाची परवानगी दिली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाचे दोन डोस घेतले की त्याला कोरोना होत नाही. त्यामुळे कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला करावी, अशी मागणीही नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा - बेस्ट'च्या मृत कामगारांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत, बेस्ट प्रशासनाची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.