ETV Bharat / state

सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन, प्रवाशांचा विनामास्क लोकल प्रवास; गर्दीचे नियोजन नाही - governments corona directives' Violation in mumbai

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. तरी पण आज अनेक रेल्वे स्थानकावरून विना मास्क लोकल प्रवास प्रवास करताना दिसून येत आहे. विना मास्क प्रवास करणार्‍यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी 500 पेक्षा जास्त जणांचे पथक सुद्धा तयार करण्यात आहे. मात्र, हे पथक फक्त महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरच दिसते. त्यामुळे इतर स्थानकातून प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहे.

प्रवाशांचा विनामास्क लोकल प्रवास
प्रवाशांचा विनामास्क लोकल प्रवास
author img

By

Published : Feb 14, 2021, 7:32 PM IST

मुंबई - कोरोनाच्या तीव्रता कमी होताच कोविड-19 संबंधित नियमाचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. मात्र, गेल्या 14 दिवसांत कोरोना सबंधित आखून दिलेल्या नियमांचे लोकल प्रवासात पूर्णतः तीन तेरा वाजले आहे. लोकल गाड्यात सोशल डिस्टन्सिंग पालन होत नसून, अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन, प्रवाशांचा विनामास्क लोकल प्रवास

कोविड नियमाचे पालन नाही

मुंबई सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली असून, गेल्या काही दिवसांत दररोजच्या रुग्णसंख्येत 200हून अधिक वाढ होत आहे. विशेष म्हणजे डोंबिवली-कल्याणमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत जात आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील कोरोनाच्या परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवून आहे. राज्य सरकारांने कोविडचे नियम आणि वेळेची मर्यादा घालून सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. कोविडच्या नियमाची अंमलबजावणीची जबाबदारी रेल्वे आणि लोहमार्ग पोलिसांना देण्यात आली. मात्र या नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत नाही.

नो मास्क नो एन्ट्रीच्या नियमाला फाटा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क लोकल प्रवासासाठी मुभा नाही. तरी पण आज अनेक रेल्वे स्थानकावरून विना मास्क लोकल प्रवास प्रवास करताना दिसून येत आहे. विना मास्क प्रवास करणार्‍यांवर रेल्वे आणि महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी 500 पेक्षा जास्त जणांचे पथक सुद्धा तयार करण्यात आहे. मात्र, हे पथक फक्त महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरच दिसते. इतर छोट्या-मोठ्या रेल्वे स्थानकावर हे पथक दिसून येत नाही. त्यामुळे इतर स्थानकातून प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहे.

पोलिसांना लोकल डब्यात तैनात करा

गर्दीचा वेळी लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे सुद्धा तीन तेरा वाजत आहे. अनेक प्रवासी लोकलमध्ये बसल्यानंतर तोंडावरील मास्क काढून बसतात. त्यामुळे इतरही प्रवाशांना त्रास होतो. सहप्रवाशांनी मास्क लावण्यास सांगितल्यास त्यांच्यामध्ये भांडणे सुद्धा होण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणि राज्य सरकारकडून प्रत्येक डब्यात पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून कोरोनाचे आखून दिलेल्या नियमांचे पालन होईल आणि लोकल प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा मिळेल, अशी प्रतिक्रिया लोकल प्रवासी निखिल लोखंडे यांनी दिले.

कठोर कारवाई करण्याची मागणी

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. लोकलमध्ये गर्दीचे नियोजन नाही. लोकलमध्ये विना मास्क प्रवासी फिरत आहेत. रेल्वे पोलीस, आरपीएफ, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड, महापालिका कर्मचारी यांनी कठोर पावले उचलून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. फक्त महत्त्वाच्या स्थानकावरच कारवाई न करता प्रत्येक लहान-मोठ्या स्थानकावर कारवाई करणारे पथक उभे करावे, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी केलेली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.