ETV Bharat / state

पार्थ पवार यांची सुप्रिया सुळे यांच्यासोबत सिल्वरओक येथे अडीच तास चर्चा - sharad pawar news

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यात सिल्वर ओक येथे दोन तास चर्चा झाली. याचर्चेत पार्थ यांनी नाराज होऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

parth pawar
पार्थ पवार
author img

By

Published : Aug 14, 2020, 12:13 AM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात जाऊन कधी राम मंदिर तर कधी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मते नोंदवणाऱ्या पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसात माध्यमांतून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याबाबत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

पार्थ पवार सिल्वर ओकवर

पार्थ पवार आणि सुप्रिया ताई सुळे यांच्यात आज सिल्वर ओक येथे तब्बल दोन तासांहून अधिक वेळ ही चर्चा झाली. याचर्चेत पार्थ पवार यांना समजावण्यात आले असल्याचे समजते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी कोरोनाकाळात राम मंदिराचे भूमिपूजन केले जात असल्या वरुन टीका केली होती. पार्थ पवार यांनी पत्रक काढून शरद पवार यांच्या विरोधी मत नोंदवले होते. त्यात पार्थ यांनी राममंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिन असल्याची भावना व्यक्त केली होती. जय श्री रामने पत्राची सुरुवात आणि शेवटी केला होता.

हेही वाचा- पार्थ पवार हे नाराज नाहीत, ते पक्ष सोडणार नाहीत- जयंत पाटील

याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल पार्थच्या वक्तव्याला कवडीची किंमत नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे पार्थ पवार आणि अजित पवार ही नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, पवार यांच्या विधानावर पार्थ पवार पासून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदींनी कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. त्यातच पार्थ पवार हे वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे पार्थ यांना तातडीने सिल्वर ओक बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.

नाराज होऊन पार्थ यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, यासाठी सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांच्याशी चर्चा केली असल्याने या प्रकरणावर पडदा टाकला जाईल, असेही सांगण्यात येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.