ETV Bharat / state

Vaalvi Movie Trailer : परेश मोकाशी दिग्दर्शित थ्रिलकॅाम 'वाळवी' च्या ट्रेलर आणि पोस्टर चे झाले अनावरण!

author img

By

Published : Jan 4, 2023, 7:56 PM IST

स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'वाळवी' (Vaalvi Movie) च्या ट्रेलर आणि पोस्टर चे नुकतेच अनावरण (Vaalvi trailer and poster released) करण्यात आले. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे आणि त्याचे दिग्दर्शन केले आहे परेश मोकाशी (Paresh Mokashi directed) यांनी केलेलं आहे. Vaalvi Movie Trailer

Vaalvi Movie Trailer
'वाळवी' च्या ट्रेलरचे अनावरण

मुंबई : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'वाळवी' (Vaalvi Movie) च्या ट्रेलर आणि पोस्टर चे नुकतेच अनावरण (Vaalvi trailer and poster released) करण्यात आले. ट्रेलर मधील रहस्यमय वातावरणात 'दिसतं तसं नसतं' ही म्हण आवर्जून उठून दिसते. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे आणि त्याचे दिग्दर्शन केले आहे परेश मोकाशी (Paresh Mokashi directed) यांनी. व त्याची प्रस्तुती केली आहे 'झी स्टुडिओज' ने. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. Vaalvi Movie Trailer

'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर काय घडू शकते? हे परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून; त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून; ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून; यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या 'वाळवी'त स्वप्नील, शिवानी, सुबोधकडे नक्की काय गुपित आहे हे चित्रपटातून समोर येईल.

दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, 'पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. 'वाळवी' ही एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच चित्रपटातील गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे.' झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी 'वाळवी'ची निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.