ETV Bharat / state

Paramveer Singh : अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील अब्रुनुकसानीचा दावा परमवीर सिंग यांच्याकडून मागे

टीआरपी घोटाळा (TRP scam case) प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Paramveer Singh) यांनी वरीष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी (Senior journalist Arnab Goswami) आणि ARG आउटलिअर (ARG outliers) यांच्याविरोधातील 90 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा (damages claim against Arnab Goswami) केला होता. तो त्यांनी मागे घेतला आहे. पण यामुळे कोर्टानं परमवीर सिंग यांना 1500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा खटला दाखल करण्यात आला होता.

Paramveer Singh
परमवीर सिंग विरुद्ध अर्णब गोस्वामी
author img

By

Published : Dec 14, 2022, 7:45 PM IST

मुंबई : टीआरपी घोटाळा (TRP scam case) प्रकरणानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Paramveer Singh) यांनी ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी (Senior journalist Arnab Goswami) आणि ARG आउटलिअर (ARG outliers) त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा (damages claim against Arnab Goswami) केला होता. आज परमवीर सिंग यांनी हा दावा मागे घेतला आहे. (Latest news from Mumbai) न्यायाधीश व्ही डी केदार यांनी परमवीर सिंग यांना 1500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आहे. (Mumbai Crime)

प्रतिमा मलीन केल्याचा होता आरोप : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वरीष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी आणि ARG आउटलिअर यांच्याविरोधातील 90 लाख रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा मागे घेतला आहे. पण यामुळे कोर्टानं परमवीर सिंग यांना 1500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या वर्षी हा खटला दाखल करण्यात आला होता. अर्णब गोस्वामींनी आपली प्रतिमा मलिन केल्याचे सांगत परमबीर सिंह यांनी गोस्वामी विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करत त्यांनी वार्षिक 12 टक्के व्याजासह 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.

त्रासाची नुकसानभरपाई द्या : परमबीर सिंह यांनी बिनशर्त खटला मागे घेण्यासाठी बुधवारी स्थानिक कोर्टात अर्ज दाखल केला होता. यावर अर्णबचे वकील प्रदीप गांधी यांनी हरकत घेतली नाही. उलट खटला दाखल करताना गोस्वामी यांना झालेल्या त्रासाची नुकसानभरपाई मागितली. यानंतर कोर्टाने म्हटले की, दावा दाखल केल्यामुळे प्रतिवादीला वकील नेमावा लागला. त्यामुळे मला वाटते खटला बिनशर्त मागे घेण्यासाठी याचिकाकर्त्याला खर्च द्यावा लागेल. यानंतर न्यायाधीशांनी वकिलांचे म्हणणे नोंदवत आणि परमबीर यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली. दरम्यान 24 मार्च 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयात गोस्वामींनी पोलिसांविरुद्ध विशेषत तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गंभीर गैरप्रकार केल्याचा आरोप केला होता. यानंतर कोर्टाने गोस्वामी यांना अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.