मुंबई - येथील जनजीवन अधिक वेगवान होण्यासाठी मुंबईच्या समांतर कोस्टल रोडची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु, एकीकडे विकास होत असताना, हा विकास मुंबईतील गिरणी कामगारांच्या अडचणी वाढणारा ठरला आहे. हा कोस्टल रोड मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातून जात आहे. या मार्गावर जोडपूल आडवा येत असल्याने 17 गिरणी कामगारांच्या घरावर बुलडोजर चालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेने या चाळीतील 17 घरांना आतापर्यंत 4 नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
'बीएमसीकडून वारंवार नोटीस'
दक्षिण मुंबईतील वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोडची बांधणी मुंबईत होत आहे. ही बांधणी काळबादेवीच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली दरम्यान कोस्टल रोडची बांधणी होत आहे. काळाबादेवीचा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी-वांद्रे सी लिंक असा पहिला टप्पा आहे. या मार्गावरुन शहरात येण्यासाठी अनेक ठिकाणी जोडरस्ते जोडले जात आहे. यासाठी सात रस्ता येथून एक पूल प्रस्तावित आहे. या प्रस्तावित पुलाच्या मार्गावर मॉर्डन मिलमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगारांची घर येत आहेत. ही घर मोकळी करण्यासाठी बीएमसीकडून वारंवार नोटीस पाठवली जात असल्याने रहिवासी त्रस्त झाले.
'लिखित माहिती दिली जात नाही'
मॉर्डन मिलच्या मालकाने या भूखंडाचा विकास करण्याचे कबुल केली आहे. तसेच, मालक येथे जादा चटईक्षेत्र देणार आहे. मात्र, बीएमसी आम्हाला रोड कापण्यात दाखवून कमी चटईक्षेत्र देणार असल्याचे रहिवाश्यांकडून सांगण्यात येत आहे. बीएमसी (275) स्वेअर फूटाचे मुंबईत इतर ठिकाणी घर देऊ असेही सांगितले जात आहे. मात्र, हे सर्व तोंडी सांगत आहेता. बीएमसीकडून कोणत्याही स्वरुपात लिखित माहिती दिली जात नाही. मॉर्डन मिलच्या मालकाने या क्षेत्राचा विकास केल्यास मालक (405) स्वेअर फुटाचे घर देणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, गिरणी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा मालकाचाही मानस आहे. मात्र, आता सागरी किनारा मार्गासाठी जागा द्यावी लागणार आहे. एक पूर्ण चाळ काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे असून, येथील रहिवासी अस्वस्थ झाले आहेत.