ETV Bharat / state

पनवेलमध्ये दारूची दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी - पनवेल महानगरपालिका बातमी

सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे आजपासून ((रविवारपासून) संबंधित दुकाने उघडण्याचे आदेश महापालिकेने दिले असून दुकाने सुरू करण्यात आली आहेत.

author img

By

Published : May 10, 2020, 7:50 PM IST

नवी मुंबई - पनवेल तालुका व पनवेल महानगरपालिका क्षेत्र हे रेड झोनमध्ये येत असून अत्यावश्यक सेवा व इतर दुकाने सध्याच्या घडीला बंद करण्यात आली होती. मात्र, लोकांची गैरसोय पाहता इतर दुकानेही सशर्त उघडण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जीवनमान पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला आहे.

पनवेलमध्ये दारूची दुकाने वगळता इतर दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता विविध व्यवसाय दुकाने सुरू करण्याची परवानगी आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे. व्यापारी संकुले व मॉल यांच्यावर असणार निर्बंध मात्र कायम राहणार आहेत. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्टेशनरी जनरल स्टोअर्स हार्डवेअर बांधकाम साहित्यातील सिमेंट पावसाळी उपकरणे आदींचा दुकानांचा यात समावेश आहे. याव्यतिरिक्त ऑटोमोबाईल वर्कशॉप इलेक्ट्रॉनिक दुकाने मोबाईल गॅलरी कपडे भांडी या दुकानांचाही यात समावेश आहे. संबंधित दुकाने सुरू करताना सामाजिक अंतर राखण्याची जबाबदारी प्रत्येक दुकानदाराची असून दुकानदारांना मास्क ग्लोव्हज इतर ओळखपत्र घालणे अनिवार्य राहणार आहे.

सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे आजपासून ((रविवारपासून) संबंधित दुकाने उघडण्याचे आदेश महापालिकेने दिले असून दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र जिम, स्विमिंग पूल, याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन नियमांचे उल्लंघन होऊ शकते व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे लॉकडाऊनपर्यंत दुकाने बंद राहणार आहेत.

कधी, काय उघडणार?

सोमवार व शुक्रवार या दिवशी स्टेशनरी जनरल स्टोअर्स हार्डवेअर बांधकाम साहित्य सिमेंट पावसाळी उपकरणे यांची दुकाने सुरू होणार असून मंगळवारी व शनिवारी ऑटोमोबाईल दुकाने वर्कशॉप वाहन गॅरेज राहणार आहे. बुधवार व रविवारी इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दुकाने, मोबाईल दुकाने, कम्प्युटर, गॅस, कुकर, मिक्सर व भांड्यांची दुकाने सुरू राहणार आहेत. गुरुवारी रेडिमेड गारमेंट कपड्यांची दुकाने मोठे शोरूम वगळता राहणार आहेत. मात्र, दारूची दुकाने उघडणार नसल्याने तळीरामांचा मात्र विरस झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.