मुंबई : श्रद्धा हत्याकांडानंतर राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पाठ (Special team to find missing people) नेमले जाईल असे महिला व बालविकास मंत्री (Women and Child Development Minister) मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी अलीकडेच जाहीर केले. त्यातच अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी राजेश पांडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अंधेरीतून गुजरातला पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलीचा शोध घेऊन पालकांच्या हवाली केले आहे. हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी पांडे अतिशय मेहनतीने प्रयत्न करून आपली कंबर कसतात. आजवर सहाशेहून अधिक लोकांचा शोध पांडे मोड्यूलने (Pandey Module for Missing People) घेतला आहे.
तब्बल 9 वर्षांनी बेपत्ता मुलगी कुटुंबीयांना भेटली: मुंबईतील डीएन नगर पोलीस स्टेशन परिसरात ९ वर्षे ७ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध ऑगस्ट महिन्यात लागला आहे. २२ जानेवारी २०१३ रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. ४ ऑगस्ट रोजी तब्बल ९ वर्षांनी हरवलेली मुलगी तिच्या कुटुंबीयांना भेटली. हे देखील शक्य झालं निवृत्त सहाय्य्क पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भोसले आणि राजेश पांडे यांच्यामुळे ९ वर्षांनी पूजा गौड आपल्या घरच्यांना पुन्हा सापडली.
2 वर्षाच्या मुलीचे केले अपहरण : मुंबईसह राज्यात मुलं चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्यात त्यातच मुलांचे अपहरण केल्याच्या अफवांचे सुद्धा पेव फुटलेले आहे. मुंबईत मूल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसलेल्या एका व्यक्तीने 2 वर्षांच्या मुलीचा अपहरण केलं. वांद्रे परिसरात ही खळबळजनक घटना घडली हा मूल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या फोटोच्या आधारे कोणीही आरोपीस पाहिल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी वांद्रे पोलिसांनी जनतेला केले आहे. हा आरोपीचा शोध घेऊन २ वर्षाच्या चिमुकलीला शोधण्याचे मोठे आव्हान पांडे यांच्या खांद्यावर आहे.
वृद्ध इसमाचा काही तासात घेतला शोध : पांडे मोड्यूलने नुकतेच रामचंद्र सावंत या वृद्ध व्यक्तीचा देखील तात्काळ तपास करून त्यांना शोधले. त्यानंतर सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे त्यांना सुपूर्द केले. रामचंद्र यांचे वडील बेपत्ता झाल्याने ते तक्रार देण्यासाठी अंधेरी पोलीस ठाण्यात आले असताना त्यांची भेट पांडे यांच्याशी झाली आणि तिथेच हि केस सुटली.
हरविलेल्या आणि सापडलेल्या लोकांचा आकडा - २०१३ पासून २०१७ पर्यंत एकूण ३३९० मुलांचे अपहरण झालेले आहे. यामध्ये आतापर्यंत ३१३१ मुलांना शोधण्यात आले आहे पण अजूनही २५९ मुले मिळाली नाहीत. तसेच सन २०१३ पासून सन २०१७ पर्यंत एकूण ५०५६ मुलींचे अपहरण झालेले होते यामध्ये आतापर्यंत ४६८६ मुली सापडल्या असुन अद्यापही ३७० मुली सापडल्या नाहीत.गेल्या चार वर्षात एकूण ६५१० पुरुष हरवले होते त्यात आतापर्यंत ५३२२ पुरुष मिळाले आहेत. पण अजूनही ११८८ पुरुष मिळाले नाहीत. त्याचबरोबर एकूण २८३९ स्त्रिया हरवल्या होत्या त्यामध्ये आतापर्यंत २३०९ स्त्रिया सापडल्या असून अजूनही ५३० स्त्रिया बेपत्ता आहेत. यावरुन गेल्या चार वर्षात मुंबई शहरातून हरविलेल्या ६२९ मुले-मुली आणि १७१८ महिला-पुरुष व्यक्तींचा शोध लागलेला नाही. हि बाब अतिशय गंभीर आहे.
हरवलेल्यांना शोधण्याकरीता पोलीस ‘पांडे मॉड्युल’ : हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरता मुंबई पोलिस आता मुंबईत ‘पांडे मॉडयुल’ राबवणार आहेत. मालाड पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी राजेश कालिदिन पांडे यांनी आतापर्यंत ६५० हून अधिक बेपत्तांचा शोध घेतला आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीचे धडे गुन्हे शाखा आणि मिसिंग पर्सन ब्युरोसह सर्व पोलिस ठाण्यांना दिले जाणार आहेत.
कोण आहेत पोलीस कर्मचारी राजेश पांडे? : पोलीस राजेश पांडे हे सध्या अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. २०११ साली सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तैनात असल्यापासून त्यांना बेपत्ता मुलांचा शोध घेण्याची आवड निर्माण झाली. लहान मुलांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचाही त्यांनी शोध घेतला होता. तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रसह, गुजरात, बिहार, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, रांची, येथील मुलांची त्यांनी घरवापसी केली होती. लोकेशन आणि व्हॉटसऍपच्या मदतीने ते बेपत्ता लोकांचा शोध घेतात. काही दिवसांपूर्वी मालाड येथे लहान मुलाचा मृतदेह आढळून आला होता.तेव्हाही पांडे यांच्या कौशल्यामुळे आरोपीपर्यंत पोलीस पोहचले होते. आजही त्यांना पर राज्यातल्या पोलिस ठाण्यातून बेपत्तांच्या शोधाच्या मदतीकरता फोन येतात.बेपत्ता मुलांचे वाढते प्रमाण पाहता मुंबई पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान ही मोहिम हाती घेतली होती. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला होता. हरवलेल्या मुलांचा जास्तीत जास्त शोध घेण्यावर मुंबई पोलिसांनी भर दिला आहे. नुकतीच मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत बेपत्ता मुलांचा शोध घेण्यावर चर्चा झाली. चर्चे दरम्यान मालाड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक राजेश पांडे हे कसे शोध घेतात, याचे धडे सर्व पोलिसांना देण्याचे ठरले आहे. म्हणूनच मुंबई पोलीसांतर्फे पांडे मॉडयुल तयार करण्यात आले आहे.