पुणे - पुलवामा येथे तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. या भीषण आत्मघातकी हल्ल्यात ४९ जवानांना वीरमरण आले. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील तरुणांनी मोर्चा काढून पाकिस्तानचा झेंडा जाळला.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पुणे शहरातील तरुणांच्या समूहाने शनिवारी हल्ल्याच्या निषेधार्थ लक्ष्मी रस्त्यावरील शगून चौकापासून अलका टॉकीज चौकापर्यंत मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली. त्याप्रमाणे सरकारने या हल्ल्याचा लवकरात लवकर बदला घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.