ETV Bharat / state

महाराष्ट्रातील कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी; 2978 कैद्यांना कोरोना, 7 जणांचा मृत्यू - maharashtra Prison news

महाराष्ट्रातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक कैद्यांसह कारागृह कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींचा मृत्यूही झाला आहे.

मुंबई
mumbai
author img

By

Published : Apr 9, 2021, 4:34 PM IST

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत. तर, दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सुद्धा वाढ होत असल्याचे समोर आले आहे. राज्यात 9 मध्यवर्ती कारागृह आहेत. तर, 31 जिल्हा कारागृह, 19 खुली कारागृह, 1 खुले वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी

2978 कैद्यांना कोरोना, 7 जणांचा मृत्यू

राज्यातील एकूण 47 कारागृहामध्ये आतापर्यंत 56221 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील आतापर्यंत 2978 कैदी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तर, उपचार घेऊन आतापर्यंत 2785 कैदी बरे झाले आहेत. 7 कैद्यांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

679 कारागृह कर्मचाऱ्यांना कोरोना, 8 जणांचा मृत्यू

राज्यातील 47 कारागृहात असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत 3814 कारागृह कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 679 कारागृह कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 8 कारागृह कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.

या कारागृहातील कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू

  • तळोजा कारागृह -2 कैदी
  • येरवडा कारागृह- 2 कैदी
  • धुळे जिल्हा कारागृह- 1 कैदी
  • अमरावती मध्यवर्ती कारागृह - कैदी
  • सोलापूर जिल्हा कारागृह- 1 कैदी
  • या कारागृहातील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
  • विसापूर खुले कारागृह - 1 कर्मचारी
  • औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह - 1 कर्मचारी
  • बीड जिल्हा कारागृह -1 कर्मचारी
  • बोरस्तल कारागृह -1 कर्मचारी
  • अमरावती कारागृह- 1 कर्मचारी
  • वाशिम जिल्हा कारागृह - 1 कर्मचारी
  • तळोजा कारागृह- 1 कर्मचारी
  • येरवडा कारागृह - 1 कर्मचारी

या कारागृहातील कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळेा मृत्यू

* विसापूर खुले कारागृह - 1 कर्मचारी
* औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह - 1 कर्मचारी
* बीड जिल्हा कारागृह -1 कर्मचारी
* बोरस्तल कारागृह -1 कर्मचारी
* अमरावती कारागृह- 1 कर्मचारी
* वाशिम जिल्हा कारागृह - 1 कर्मचारी
* तळोजा कारागृह- 1 कर्मचारी
* येरवडा कारागृह - 1 कर्मचारी

बहुतांशी कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी

राज्यातील बहुतांशी कारागृहामध्ये प्रमाणापेक्षा अधिक कैदी ठेवलेले आहेत. येरवडा कारागृहाची क्षमता केवळ 2449 कैदी ठेवण्याची आहे.र मात्र, येथे तब्बल 6018 कैदी ठेवण्यात आले आहेत. सातारा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 168 कैद्यांची आहे. या ठिकाणी 373 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1699 कैद्यांची आहे. या ठिकाणी तब्बल 2044 कैदी ठेवण्यात आले आहेत. औरंगाबाद कारागृहाची क्षमता 539 कैद्यांची आहे. येथे 1245 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.मुंबईतील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता केवळ 804 कैद्यांची आहे. येथे तब्बल 2782 कैदी ठेवण्यात आले आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1105 कैद्यांची, त्या ठिकाणी 3728 कैदी ठेवण्यात आले आहेत. तळोजा कारागृहाची क्षमता 2124 कैद्यांची, या ठिकाणी 3444 कैदी ठेवण्यात आले आहेत. कल्याण मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 540 कैद्यांची असताना या ठिकाणी 1951 कैदी ठेवण्यात आलेले आहेत. मुंबईच्या भायखळा येथील महिला कारागृहाची क्षमता 262 कैद्यांची आहे. या ठिकाणी 326 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.

नागपूर मध्यवर्ती कारागृहाची क्षमता 1810 कैद्यांची आहे. येथे 2410 कैदी ठेवण्यात आले आहेत. तर, अमरावती कारागृहाची क्षमता 943 कैद्यांची असताना या ठिकाणी 1023 कैदी ठेवण्यात आलेले आहेत.

राज्यातील एकूण कारागृहात सध्याच्या घडीला 23217 कैद्यांची क्षमता असताना तब्बल 34320 कैदी हे ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - मुंबईतील २१ वर्षीय लेडी डॉनला अटक, चरस आणि एमडीची करायची तस्करी

हेही वाच - 'एमआयडीसी'वरील सायबर हल्ला रशियातून!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.