मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. आज बुधवारी 11 हजार 800 डोसच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या उद्दिष्टापेक्षा 91 टक्के म्हणजेच 9 हजार 830 डोसचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1 लाख 86 हजार 158 आरोग्य कर्मचारी तर 13 हजार 754 फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. को-विन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज बुधवारी 34 लसीकरण केंद्रांवर 108 बूथवर 5000 आरोग्य कर्मचारी तर 5800 फ्रंट लाईन वर्कर अशा एकूण 11 हजार 800 जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. उदिष्टापेक्षा 91 टक्के म्हणजेच 9 हजार 830 लसीकरण करण्यात आले. त्यातील 6 हजार 481 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 369 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाचा 9 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाला. आतापर्यंत 1 लाख 86 हजार 158 लाभार्थ्यांना पहिला तर 13 हजार 754 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 99 हजार 912 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
कामा हॉस्पिटल 1 हजार 817
जसलोक हॉस्पिटल 210
एच एन रिलायंस 413
सैफी रुग्णालय 236
ब्रीच कॅंडी हॉस्पिटल 196
भाटिया हॉस्पिटल 23
कस्तुरबा हॉस्पिटल 4 हजार 629
नायर हॉस्पिटल 22 हजार 706
जेजे हॉस्पिटल 1 हजार 419
ओकहार्ड हॉस्पिटल 6
केईएम 20 हजार 928
सायन हॉस्पिटल 9 हजार 696
हिंदुजा हॉस्पिटल 23
व्ही एन देसाई 2 हजार 886
बिकेसी जंबो 20 हजार 060
बांद्रा भाभा 7 हजार 035
लिलावती हॉस्पिटल 46
सेव्हन हिल हॉस्पिटल 11 हजार 888
कूपर हॉस्पिटल 11 हजार 823
नानावटी हॉस्पिटल 109
कोकीलाबेन हॉस्पिटल 91
गोरेगाव नेस्को 7 हजार 215
एस के पाटील 2 हजार 373
एम डब्लू देसाई हॉस्पिटल 1 हजार 362
डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 16 हजार 857
दहिसर जंबो 2 हजार 977
भगवती हॉस्पिटल 1 हजार 935
कुर्ला भाभा 1 हजार 954
सॅनिटरी गोवंडी 3 हजार 657
बीएआरसी 917
माँ हॉस्पिटल 3 हजार 612
राजावाडी हॉस्पिटल 17 हजार 504
एल. एच. हिरानंदानी 37
वीर सावरकर 2 हजार 887
मुलुंड जंबो 6 हजार 523
फोरटीस मुलुंड 34