मुंबई - केरळमध्येही शिवसेना असल्याने लुंगी घालून शिवसैनिकांनी माझा सत्कार केला. यात विरोधकांनी टीका करण्याचे कारण नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांची प्रचार सभा नेहरुनगर येथे घेण्यात आली. या सभेला शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा मतदारसंघातील इतर भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेतील पोस्टर लावले होते. यानंतर दक्षिणेकडील मतदारांना आकर्षित करण्यासाठी लुंगी घातली. यावर आदित्य ठाकरेंवर सर्वत्र टीका होत आहे.
हेही वाचा- ते मुस्लीम भारतात रोजगार हिसकवण्यासाठी येतात; भाजप प्रवक्त्याचे वादग्रस्त वक्तव्य
इतर राज्यातील शिवसैनिकांनीही पक्षाचे कार्य केलेले आहे. तेथील शिवसैनिकांनी माझा सत्कार करण्याचे ठरवले होते. या सत्कारप्रसंगी त्यांनी मला लुंगी दिली यात वेगळे वाटण्यासारखे काही नाही. शिवसेना केरळमध्येही आहे. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हेही वाचा- विरारमध्ये अनाधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू
शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला. हा वचननामा भाजप-शिवसेनेने एकत्र करून जर छापला असता, तर एक मोठा ग्रंथ झाला असता. महाराष्ट्रासाठी खुप मोठी स्वप्ने आहेत, ती सर्व पूर्ण करायची आहेत. भाजपने आपला संकल्पनामा जाहीर केला. या संकल्पनाम्यात महात्मा ज्योतिराव फुले, वि. दा. सावरकर यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासंदर्भात (भारतरत्न) पाठपुरावा करण्याचे भाजपकडून संकल्पनाम्यात जाहीर केले आहे. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, सावरकर व महात्मा फुले यांना भारतरत्न देण्याची आमची खुप अगोदरपासून मागणी आहे.