मुंबई : केंद्रातील भाजपा सत्तेला पायउतार करून 2024 साली सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वच छोटे-मोठे सर्वच पक्ष एकत्र आले आहे. त्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेले अनेक दिवसांपासून भाजपा विरोधातील सर्वच छोट्या-मोठ्या, प्रादेशिक पक्षांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. 23 जूनला पाटण्यात बैठकीचे आयोजन केले होते. भाजपा विरोधातील 15 पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली. बैठकीनंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा विरोधातील आपले मनसुबे स्पष्ट केले. याच बैठकीमधून विरोधकांची दुसरी बैठक बंगळुरू येथे आज आणि उद्या होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहे. परंतु उद्या ते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
जागा वाटपावरून एकमत : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू व काश्मीर या राज्यांचा लोकसभेच्या जागांमुळे देशाचा पंतप्रधान ठरवण्यात मोठा वाटा असणार आहे. या राज्यांतील 274 जागा खूप महत्वाच्या आहे. काँग्रेस देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे जागा वाटपावरून एकमत होणे गरजेचे आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जागा वाटपावर मवाळ भूमिका घेऊ शकतात.
विरोधकांच्या बैठकीला जाणे अचानक रद्द : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार गटाचे कार्य अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आम्ही आमच्या दैवताला भेटून आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु नेमकी भेटीमागचे कारण गुलदस्त्यात राहिले आहे. त्यातच शरद पवारांनी आज विरोधकांच्या बैठकीला जाणे अचानक रद्द केले. त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहे. राज्यातील विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे शरद पवारांची कोणती रणनीती असू शकते? शरद पवारांनी बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला जाण्याचे का टाळले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संजय राऊत यांनी देखील शरद पवार उद्या विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, असे ट्विट केले आहे.
-
#UPDATE | Multiple sources in Sharad Pawar faction of NCP say decision to attend Day 2 of opposition meet in Bengaluru to be taken “later today or early tomorrow” https://t.co/OnPSi5VTdp
— ANI (@ANI) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Multiple sources in Sharad Pawar faction of NCP say decision to attend Day 2 of opposition meet in Bengaluru to be taken “later today or early tomorrow” https://t.co/OnPSi5VTdp
— ANI (@ANI) July 17, 2023#UPDATE | Multiple sources in Sharad Pawar faction of NCP say decision to attend Day 2 of opposition meet in Bengaluru to be taken “later today or early tomorrow” https://t.co/OnPSi5VTdp
— ANI (@ANI) July 17, 2023
-
पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगलरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखश्री. उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
श्री.शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.श्री. पवार साहेब उद्या सकाळी बंगलरू येथील बैठकीस उपस्थित राहतील.हे मी खात्रीने…
">पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगलरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखश्री. उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2023
श्री.शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.श्री. पवार साहेब उद्या सकाळी बंगलरू येथील बैठकीस उपस्थित राहतील.हे मी खात्रीने…पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगलरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखश्री. उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील.
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2023
श्री.शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.श्री. पवार साहेब उद्या सकाळी बंगलरू येथील बैठकीस उपस्थित राहतील.हे मी खात्रीने…
-
उद्या दिनांक १८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ खा. शरद पवार साहेब हे बेंगळूरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
— NCP (@NCPspeaks) July 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">उद्या दिनांक १८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ खा. शरद पवार साहेब हे बेंगळूरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
— NCP (@NCPspeaks) July 17, 2023उद्या दिनांक १८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ खा. शरद पवार साहेब हे बेंगळूरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
— NCP (@NCPspeaks) July 17, 2023
राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये बंडखोरी : आपण शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहिले आहे. अजित पवार यांनी आठ आमदारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. ते शिंदे- भाजपा सरकारसोबत सत्तेत सामील झाले आहेत. आता अधिवेशनाच्या अगोदर रविवारी सकाळी अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा सहभाग होता.
हेही वाचा :
- NCP Political Crisis : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांकडे केली दिलगिरी व्यक्त; मार्ग काढण्याची विनंती - जयंत पाटील
- Sharad Pawar supporter : 'त्या' आमदारांच्या मतदार संघातील 80 टक्के कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी - महेश तपासे
- Maharashtra Monsoon Session 2023 : शरद पवार गटातील नेत्यांना अजित दादांसोबत बसायाचं नाही; जितेंद्र आव्हाडांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र