ETV Bharat / state

सोनिया गांधींनी बोलावलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नांबाबत होणार चर्चा

author img

By

Published : May 22, 2020, 7:20 AM IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगच्या माध्यमातून देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यात मागील काही दिवसांमध्ये स्थलांतरीत मजुरांसोबत सरकारकडून करण्यात आलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती दिली जाणार आहे. आज दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे.

Sonia Gandhi
सोनिया गांधी

मुंबई - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात मागील काही दिवसांमध्ये स्थलांतरीत मजुरांसोबत सरकारकडून करण्यात आलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती दिली जाणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ही महिती देणार आहेत. कोरोनासाठी पुढील काळात काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, हेही सांगणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या व्हिडिओ कॉन्फरन्स‍िंगच्या माध्यमातून ही बैठक आज दुपारी ३ वाजता घेणार आहेत. या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माकप नेते सीताराम येचूरी, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, द्रमुकनेते एम.के.स्टॅलिन, पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

देशात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक राज्यांमध्ये कामगार, स्थलांतरीत मजूर, खासगी संस्थांतील कामगारांचे मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे स्थलांतरीत मजुरांचे प्रचंड हाल सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजसोबतच संकटात सापडलेल्या राज्यांच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे, काँग्रेसकडून सांगण्यात आले.

राज्यातून काँग्रेसने आपल्या स्वखर्चाने २७ हजारांहून अधिक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवले आहे. तर शेकडो जणांना या लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारची मदतही दिली आहे. त्याची माहिती काँग्रेसकडून होत असलेल्या बैठकीत दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.