ETV Bharat / state

ब्रूक्स फार्मा कंपनीची वकिली करायला लागली तर आम्ही तीही करू - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर - विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर दिलीप वळसे पाटील

जनतेसाठी 100 गुन्हे दाखल केले तरी मी आणि देवेंद्र फडणवीस त्यासाठी तयार आहोत, असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे. पोलिसांकडे माहिती होती त्यामुळे ब्रुक कंपनीच्या संचालकाची चौकशी, यापुढे सरकारी कामात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इशारा दिला होता. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Breaking News
author img

By

Published : Apr 18, 2021, 10:38 PM IST

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकर जनतेच्या जिवाचे रक्षण करू शकत नाही, असा आरोप केला. जनतेसाठी 100 गुन्हे दाखल केले तरी मी आणि देवेंद्र फडणवीस त्यासाठी तयार आहोत, असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे. पोलिसांकडे माहिती होती त्यामुळे ब्रुक कंपनीच्या संचालकाची चौकशी, यापुढे सरकारी कामात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इशारा दिला होता. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करावी लागली तरी आम्ही करू, मात्र तुम्ही वाझेची वकिली करता त्याचे काय? असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केला. राज्य सरकारला रेमेडेसिवीरसाठी आवश्यक परवानगीची कल्पना नव्हती. मी स्वतः राजेंद्र शिंगणे यांना भेटून आम्ही हे विकणार नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. ब्रुक फार्माच्या मालकाला पोलिसांनी आरोपीसारखे ताब्यात घेतले. आम्ही पोलीस आयुक्त-उपायुक्तांना देखील फोन केला होता. मात्र, त्यांचे वक्तव्य सरकारच्या दबावाखाली असल्यासारखे वाटत होते, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

आम्ही हस्तक्षेप केला

आम्ही हस्तक्षेप 100 टक्के केला, त्यामुळे आम्ही केंद्रातील मंत्र्यांसोबत देखील बोललो होतो. रेमेडेसिवीर मिळणे हा आमचा उद्देश होता. 100 चौकशा केल्या तरी चालतील. तुम्हाला 60 हजाराचा साठा असल्याची माहिती मिळाली होती तर ती जाहीर करा, असे आव्हान दरेकरांनी दिलं आहे. आम्ही रेमेडेसिवीरचा धंदा भाजप कार्यालयातून मांडणार नव्हतो, असेही दरेकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.