ETV Bharat / state

सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही पुरावे न्यायालयात सादर करू - फडणवीस - देवेंद्र फडणवीस रश्मी शुक्ला अहवाल

एखादा गुन्हा घडणार असेल किंवा मोठा भ्रष्टाचार होणार असेल तरीही फोन टॅपिंग केली जाते, हे या अहवालत नमूद करण्यात आलेलेच नाही, असे फडणवीस म्हणाले.

मुंबई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis

author img

By

Published : Mar 26, 2021, 5:05 PM IST

Updated : Mar 26, 2021, 6:48 PM IST

मुंबई - मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सरळमार्गी अधिकारी असून मंत्र्यांनी त्यांच्याकडून अहवाल तयार करून त्यांची त्यावर सही घेतली असेल, अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केली. मी पोलीस विभागातील बदल्यांच्या घोटाळ्याचे दोन पानाचे पत्र माध्यमांना दिले होते. अहवाल 'पेन ड्राइव्ह'मधून केंद्रीय गृहसचिवांना दिला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी तर संपूर्ण अहवालच जाहीर केला आहे. यावर सरकार चौकशी करणार असेल तरी काही हरकत नाही, आम्ही आमच्याकडील पुरावे न्यायालयात सादर करू, असेही फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माहिती देताना

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना दोषी ठरवणाऱ्या मुख्य सचिवांच्या अहवालावर बोलताना फडणवीस म्हणाले, कुंटे यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ते साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यांनी हा अहवाल तयार केलाच नाही, असे मला वाटते. जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक यांनी हा अहवाल तयार केला असेल आणि त्यावर कुंटे यांनी सही केली असेल, असाच हा अहवाल आहे. तसे नसते तर या अहवालात प्रचंड चुका आढळल्याच नसत्या, असेही त्यांनी सांगितले. या अहवालात अनेक चुका आहेत. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो, असे म्हटले आहे. परंतु, या अहवालात फोन टॅपिंगचे आणखी एक कारण दडवून ठेवले आहे. एखादा गुन्हा घडणार असेल किंवा मोठा भ्रष्टाचार होणार असेल तरीही फोन टॅपिंग केली जाते, हे या अहवालत नमूद करण्यात आलेलेच नाही, असे फडणवीस म्हणाले.

या प्रकरणात आमच्याकडे भरपूर पुरावे आहेत. आम्ही न्यायालयात पुरावे देऊ असेही फडणवीस शेवटी म्हणाले. काल मुख्य सचिवांच्या अहवालानंतर आज फोन टॅपिंग अहवाल लीक झाल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई सायबर सेलकडून गुन्हा दाखल झाला आहे.

Last Updated : Mar 26, 2021, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.