ETV Bharat / state

Ajit Pawar Reaction : राज्यपालांच्या विधानावर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले... - छत्रपती शिवाजी महाराज

Ajit Pawar Tweet: राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या दिशांत कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले आहेत असे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राज्यभर नाही, तर देशभरातून टीका होत आहे.

Ajit Pawar Tweet
Ajit Pawar Tweet
author img

By

Published : Nov 20, 2022, 3:42 PM IST

मुंबई: राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी संभाजीनगरमध्ये विद्यापीठाच्या दिशांत कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आता जुने आदर्श झाले आहेत असे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राज्यभर नाही, तर देशभरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत राज्यपालांना लवकर सद्बुद्धी येवो, अशी प्रार्थना करणारे ट्विट केल आहे.

  • महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही मा. राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर मा. राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुनर्विचार करण्याची वेळ: महाराष्ट्राच्या राज्यपालपदी 3 वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपाल महोदयांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील. महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे आपल्या ट्विट मधून अजित पवार म्हणाले. तसेच महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत.

ट्विट मधून अजित पवारांनी राज्यपालांना टोला: राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर, लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला. यापुढेही घडत राहील. राज्यपाल महोदयांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे. राज्यपाल महोदयांना सद्‌बुद्धी लाभो, ही प्रार्थना असल्याचे आपल्या ट्विट मधून अजित पवारांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

Ajit Pawar Tweet
Ajit Pawar Tweet

भाजपाचा जंतू दिल्लीत वळवळला: तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावरही बीडच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली होती, असे वक्तव्य एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं. यावर भारतीय जनता पक्षाचा जंतू दिल्लीत वळवला. आपल्या दैवतांवर चिखल फेक करून इतरांची प्रतिमा संवर्धन करण्याचा हा डाव तर नाही ना, असा संशय रोहित पवार यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.