ETV Bharat / state

संजय राऊत सचिन वाझेंची इतकी पाठराखण का करत आहेत? दरेकरांचा सवाल - प्रवीण दरेकर

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, संजय राऊत हे सचिन वाझेंची पाठराखण करण्यासाठी का आग्रही आहेत? हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

सचिन वाझेंची इतकी पाठराखण का करत आहेत? दरेकरांचा सवाल

author img

By

Published : Mar 19, 2021, 1:03 PM IST

मुंबई - सचिन वाझे यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस अनेक नवनवीन खुलासे होत आहेत. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी सज्ज स्कॉर्पिओ आणि मनसूख हिरेन मृत्यू या प्रकरणाचा सचिन वाझे यांनीच संपूर्ण कट रचला आहे. या संदर्भातील सगळे पुरावे आता समोर आलेले आहेत. मात्र, असे असतानादेखील शिवसेना सचिन वाझेंना पाठीशी का घालत आहे? ही पाठराखण का केली जात आहे? असा सवाल करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शिवसेना नेेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते आजच्या सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना बोलत होते.

संजय राऊत वाझेंना पाठीशी का घालत आहेत-

शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले, संजय राऊत हे सचिन वाझेंची पाठराखण करण्यासाठी का आग्रही आहेत? हा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. सचिन वाझे यांच्या पाठी जे कोणी राजकीय नेते आहेत, ज्यांचा वरदहस्त आहे, त्यांची नावे लवकरच बाहेर पडण्याची शक्यता आहे. एनआयए त्यांच्यावरती देखील योग्य पद्धतीने कारवाई करेल, अशी आम्हाला आशा आहे.

मराठा आरक्षणाचे सरकारला गांभीर्य नाही-

मराठा आरक्षणा संदर्भात सरकार चुकीची भूमिका मांडत असून हे प्रकरण ताटकळत ठेवले जात आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद केला जात आहे. सरकार या प्रकरणाला अजिबात गांभीर्याने घेत नाही, असा आरोप यावेळेस प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

म्हणूनच मराठा आरक्षण रखडले-

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणा संदर्भात माध्यमांमध्ये चुकीचे भूमिका मांडत आहेत. या सरकारची मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मानसिकताच दिसून येत नाही. कारण गेल्या सरकारमध्ये आम्ही सत्तेत असताना योग्य पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. परंतु ते पुढे टिकवण्याची जबाबदारी या सरकारची होती. या सरकारने त्यासंदर्भात उदासीनता दाखवलेली आहे. तसेच सुप्रीम कोर्टामध्ये योग्य प्रकारे युक्तिवाद करण्यात आला नाही. त्यामुळेच हे आरक्षण सध्या रखडलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.