ETV Bharat / state

धनगरांचे प्रश्न भाजप सरकारच सोडवू शकेल - महादेव जानकर

'काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारमध्ये ओबीसी आणि धनगर समाजाची अवस्था बिकट होती. पण भाजप सरकारने समाजाला राजकीय वाटा दिला आहे. मोदी आणि फडणवीस हेच धनगरांचे प्रश्न सोडवतील', असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.

author img

By

Published : Aug 25, 2019, 7:06 PM IST

धनगरांचे प्रश्न भाजप सरकारच सोडवू शकेल- महादेव जानकर

मुंबई - 'काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारमध्ये ओबीसी आणि धनगर समाजाची अवस्था बिकट होती. पण भाजप सरकारने समाजाला राजकीय वाटा दिला आहे. मोदी आणि फडणवीस हेच धनगरांचे प्रश्न सोडवतील', असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या 16 व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथे आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.

मराठा आरक्षण प्रश्न सरकारने सोडवला. आता धनगरांना देखील हेच सरकार आरक्षण देऊ शकेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला. धनगर समाजासाठी भाजप सरकारने 22 योजना लागू केल्या आहेत. त्याअंतर्गत 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

रासपासाठी ५७ जागा सोडण्याची मागणी-

या मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार प्रवीण दरकेर आणि राहुल कुल आदी नेतेमंडळी उपस्थित होती. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडे त्यांनी रासपसाठी 57 जागा सोडाव्यात, अशी मागणी केल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

Intro:मुंबई

काँग्रेस राष्ट्रवादी सरकार मध्ये ओ बी सी आणि धनगर समाजाची अवस्था बिकट होती. पण भाजप सरकार ने समाजाला राजकीय वाट दिला आहे. धनगर समाजाचे 60 टक्के काम झालं आहे 40 टक्के काम राहिल आहे. म्हणून मोदी आणि फडणवीस हेच धनागरांकगे प्रश्न सोडवतील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 57 जागेची मागणी केली आहे. मात्र आमच्या पक्षाला मान्यता मिळेल एवढ्या जागा तरी देण्यात याव्या अशी विनंती आम्ही मित्रपक्षांना केली आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशु संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 
Body: महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा 16 व्या वर्धापन दिनानिम्मित आज दादर मध्ये महामेळावा आज घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.या मेळाव्यात महादेव जानकर यांचा सह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार प्रवीण दरकेर आणि राहुल कुल हे  नेते उपस्थित हिते.  आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर महादेव जानकर हे या ठिकाणी आपलं शक्तिप्रदर्शन केलं असून या विधानसभेसाठी भाजपला आपल्या पक्षाला 57 जागा सोडाव्यात अशी मागणी केली आहे.

गेली 16 वर्ष रासप  चार राज्यात  काम करत आहे. लवकरच राष्ट्रीय पक्ष कसा होईल यासाठी काम करणार असून यासाठी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात ही अपेक्षा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच येणारी विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाच्या चिन्हावर लढणार. मी संपूर्ण आयुष्य पक्ष बनवण्यासाठी खर्ची केला म्हणून पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे.मराठा आरक्षण प्रश्न सरकारने सोडवला आता धनगरांना देखील हेच सरकार आरक्षण देऊ शकेल. धनगर समाजाला 22 योजना लागू केल्या. 1000 कोटी तरतूद करण्यात आली आहे. असेही जानकर यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.