ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : सह्याद्री वाहिनीवरुन 'टीली-मिली' कार्यक्रमातून शिक्षणाचे धडे - टिली मिली कार्यक्रम ऑनलाईन शिक्षण

मागील अनेक दिवसांपासून दूरदर्शनवर ऑनलाईन शिक्षणासाठी वेळ देण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला वेळेत प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षण मंत्र्यांनी जिओ वाहिनीच्या नऊ वाहिन्या आणि जिओ रेडिओसोबत करार करून शैक्षणिक कार्यक्रम त्यावर सुरू केले होते.

sahyadri channel
सह्याद्री वाहिनी
author img

By

Published : Jul 21, 2020, 9:19 AM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भात लक्षात घेता राज्य शालेय शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. त्याच पार्श्वभूमीर आता दूरदर्शनवर पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठी 'टीली-मिली' नावाची आनंददायी शिक्षण देण्याची मालिका ही सोमवार ते शनिवार या कालावधीत सुरू असणार आहे. याची सुरुवात 20 जुलैला झाली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

मागील अनेक दिवसांपासून दूरदर्शनवर ऑनलाईन शिक्षणासाठी वेळ देण्याची मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याला वेळेत प्रतिसाद मिळाला नसल्याने शिक्षण मंत्र्यांनी जिओ वाहिनीच्या नऊ वाहिन्या आणि जिओ रेडिओसोबत करार करुन शैक्षणिक कार्यक्रम त्यावर सुरू केले होते. मात्र, नुकतेच त्यांना सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्याची परवानगी मिळाली. यानंतर 'टीली'मिली' कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाचे धडे दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर द्यायला सुरुवात झाली.

program schedule
कार्यक्रमाचे वेळापत्रक

हेही वाचा - गणेशोत्सवानिमित्त कोकणात एसटीने जाण्यास सशर्त मान्यता - परिवहन मंत्री

मालिकेची सुरुवात सकाळी साडेसात वाजता आठवीच्या धड्यांपासून होणार आहे. ही मालिका दुपारी १२ पर्यंत चालणार आहेत. यात आठवीसाठी साडेसात आणि अर्ध्या तासाने सातवीसाठी वेळ देण्यात आला आहे. तर नऊ वाजता सहावी आणि अर्ध्या तासाने पाचवीसाठीचे धडे यावर असणार आहेत. तसेच चौथीचे सकाळी १० वाजता तर तिसरी अर्ध्या तासाने म्हणजेच साडेदहा वाजता, दुसरीसाठी ११.३० ते पुढे अर्धा तास आणि सर्वात शेवटी पहिलीसाठी दुपारी १२ वाजता वेळ देण्यात आला असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.