ETV Bharat / state

Onion Seller Farmers : नाफेडने कांदा खरेदीसाठी लादल्या जाचक अटी; शेतकरी अडचणीत

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 40% शुल्क आकारल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून कांदा खरेदी केंद्र सुरू करत शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला जात आहे. मात्र नाफेडच्या जाचक अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना केंद्रावर कांदा विक्री करताना अनेक अडचणी येत आहेत. नाफेडची कांदा खरेदी प्रक्रिया येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा वांदा निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Onion Seller Farmers In Trouble) (NAFED conditions for onion purchase) (40 percent duty on onion export) (NAFED onion procurement process) (farmers trouble due to NAFED terms) (Onion Seller About NAFED)

Onion Seller Farmers In Trouble
नाफेड
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 8:58 PM IST

कांदा विक्री प्रक्रियेबद्दल शेतकरी नेत्यांची प्रतिक्रिया

मुंबई: भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर शेती केली जात असते. राज्यातील शेती पिकांमध्ये कांदा, ऊस, कापूस सोयाबीन टोमॅटो द्राक्षे आणि अन्नधान्यांची देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. गेल्या काही दिवसापासून टोमॅटोचा भाव वाढल्यामुळे सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो काहीसा बाजूला सरला गेलाय. (Onion Seller Farmers In Trouble) (NAFED conditions for onion purchase) (40 percent duty on onion export) (NAFED onion procurement process) (farmers trouble due to NAFED terms) (Onion Seller About NAFED)

नाफेडकडून शेतकऱ्यांची चेष्टा: राज्यातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकांवर 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची दर पाडले जातात. त्यानंतर नाफेडच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करणार आहे. मात्र कांदा खरेदीसाठी नाफेडच्या 12 अटी म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे अजित नवले यांनी म्हटले. या 12 अटीतून पास झालेला कांदाच नाफेड खरेदी करणार आहे. यामुळे भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. चार महिने चाळीत साठवलेला कांदा ह्या 12 अटी-शर्ती पास करेल असा कांदा महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही, अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. शेतकऱ्यांची क्रूर चेष्ठा सरकार करत असल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

कांदा विक्रीसाठी लागणारे कागदपत्रे: आधार कार्ड झेरॉक्स, 7/12 झेरॉक्स, शेतीत कांदा पिक लागलेले असले पाहिजे, बँक पासबुक झेरॉक्स, या सर्व झेरॉक्स कागदपत्रांवर स्वाक्षरी करून जमा करणे.

खालील गुणवत्ता असलेला कांदा घेतला जाणार नाही: विळा लागलेला, पत्ती निघालेला, काजळी लागलेला, रंग गेलेला, कोंब फुटलेला, कांदा नरम झालेला, आकार बिघडलेला, चट्टे पडलेला, वास येणारा, बुरशी आलेला

सर्रास कांदा खरेदी करावा-तळेकर: शेतकऱ्यांचा कांदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी केला जाणार आहे. ज्या जाचक अटी कांदा खरेदीसाठी तयार केल्या आहेत, त्या जाचक अटी काढून टाकावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अटी या निरर्थक असून शेतकरी चांगलाच कांदा साठवीत असतो. त्यामुळे चांगला भाव देखील शेतकऱ्यांना मिळत असतो. शेतकऱ्यांचा जो कांदा आहे तो सर्रासपणे खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरी राजेंद्र तळेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा:

  1. Devendra Fadnavis On Onion Purchase : राज्य सरकारकडून 18 हजार टन कांद्याची खरेदी; विरोधकांच्या आरोपांवर देव्रेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर
  2. चाळीसगाव बाजार समितीत सोमवारपासून कांदा खरेदी होणार सुरू
  3. नाशिक: जिल्हाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांची बैठक रद्द, आता विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.