ETV Bharat / state

कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात आणले पाणी, राज्यात कांद्याचे दराने गाठला उच्चांक

गेल्या ३ महिन्यांपासून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सुरुवातीला 30 रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्याने आता शंभरी गाठली आहे. आज नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 11 हजार 300 रुपये इतका भाव मिळाला आहे.

onion
कांद्याचे दर वाढले
author img

By

Published : Dec 2, 2019, 7:06 PM IST

Updated : Dec 2, 2019, 8:05 PM IST

नाशिक - कांदा ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचल्याचे चित्र सध्या नाशकात पाहायला मिळत आहे. नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला आज(सोमवार) तब्बल 11 हजार 300 प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे, तर सोलापुरात कांद्याचा प्रति क्विंटल भाव १५ हजारांवर पोहोचला आहे. बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्याने जास्त भाव मिळाल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात येत आहे.

पिंपळगाव बाजार समितीत कांदा 11 हजार 300 रुपये प्रति क्विंटल

हेही वाचा - दरात घसरण तरीही कांदा रडवणार, अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान

मागील तीन महिन्यांपासून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत आहे. सुरुवातीला 30 रुपये किलोने मिळणाऱ्या कांद्याने आता शंभरी गाठली आहे. आज नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 11 हजार 300 रुपये इतका भाव मिळाला आहे. पिंपळगाव बाजार समितीमध्ये केवळ 500 क्विंटल इतका कमी कांदा आल्याने कांद्याला वाढीव भाव मिळाला आहे. पिंपळगाव बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वाधिक भाव मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - ...तर पंतप्रधानांना पाय उतार व्हावे लागेल - नवाब मलिक

दुसरीकडे कळवण बाजार समितीमध्ये देखील कांद्याला 11 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या महिन्याचे बजेट कोलमडल्याने सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे उन्हाळा कांद्याचे सर्वत्र मोठे नुकसान झाले, तर लाल कांदा देखील वेळेत बाजारात दाखल झाला नसल्याने आवक घटली आहे. परिणामी कांद्याचे भाव वाढल्याचे पाहायला मिळाले. पुढील 10 ते 12 दिवसात लाल कांदा बाजारात आल्यावर भाव नियंत्रणात येतील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कशी वाढ झाली कांद्याच्या भावात -

नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधी किमान कमाल दर -

  • ऑगस्ट - 1000 ते 3000 प्रति क्विंटल
  • सप्टेंबर-3000 ते 4000 प्रति क्विंटल
  • ऑक्टोबर-4000 ते 4500 प्रति क्विंटल
  • नोव्हेंबर-7000 ते 9000 प्रति क्विंटल
  • डिसेंबर-9000 ते 11000 प्रति क्विंटल

Intro:कांदा ऐतिहासिक उंचीवर,पिंपळगाव बाजार समिती मध्ये कांद्याला 11300 प्रति क्विंटल भाव...

Body:नाशिक मध्ये कांदा ऐतिहासिक उंचीवर जाऊन पोहोचल्याचे चित्र आहे..नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला आज तब्बल अकरा हजार तीनशे प्रति क्विंटल इतका भाव मिळला.. बाजार समिती मध्ये आवक कमी झाल्याने जास्त भाव मिळाल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात येत आहे...

मागील तीन महिना भरापासून कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होते आहे,सुरवातीला 30 रुपये किलोने मिळणारा कांद्याने शंभरी गाठली आहे...आज नाशिकच्या पिंपळगाव बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 11300 रुपये इतका भाव मिळाला,पिंपळगाव बाजार समिती मध्ये केवळ 500 क्विंटल इतका कमी कांदा आल्याने कांद्याला वाढीव भाव मिळाला,पिंपळगाव बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वाधिक भाव मिळाला असल्याचे बोलले जात आहे,
तर दुसरीकडे कळवण बाजार समितीमध्ये देखील कांद्याला अकरा हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला, कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, मात्र दुसरीकडे ग्राहकांचं महिन्याचे बजेट कोलमडल्याने सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी होत आहे..दोन महिन्याभरा पूर्वी अवकाळी पावसामुळे उन्हाळा कांद्याचे सर्वत्र मोठे नुकसान झाले,तर लाल कांदा देखील वेळेत बाजारात दाखल झाला नसल्याने आवक घटली आहे, परिणामी कांद्याचे भाव वाढले,पुढील 10 ते 12 दिवसात लाला कांदा बाजारात आल्यावर भाव नियंत्रणात येतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे..

एक नजर टाकुयात कांद्याच्या भावात कशी वाढ झाली,
नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती मधी किमान कमाल दर..

ऑगस्ट -1000 ते 3000 प्रति क्विंटल
सप्टेंबर-3000 ते 4000 प्रति क्विंटल
ऑक्टोबर-4000 ते 4500 प्रति क्विंटल
नोव्हेंबर-7000 ते 9000 प्रति क्विंटल
डिसेंबर-9000 ते 11000 प्रति क्विंटल

टीप फीड ftp
nsk onion viu 1
nsk onion viu 2
nsk onion viu 2

Conclusion:
Last Updated : Dec 2, 2019, 8:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.