ETV Bharat / state

Maharashtra Politics : मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत, शिंदेंच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण! जाणून घ्या A टू Z

नाट्यमयरित्या सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांनी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करण्यापासून ते गुजरात, आसाम आणि गोव्यातील हॉटेल्समध्ये तळ ठोकण्यापर्यंत, महाराष्ट्राचा राजकीय शो कसा सुरू झाला?, जाणून घ्या टाइमलाईन..

Maharashtra Politics
महाराष्ट्राचे राजकारण
author img

By

Published : Jun 20, 2023, 3:40 PM IST

मुंबई : तारीख 20 जून 2022, विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. कोण निवडले जाईल याची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण होते. निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते 'वर्षा' बंगल्यावर जमले होते. त्याचवेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. शिंदे बंड करून सूरतला पोहोचले आणि पुढच्या दहा दिवसांत राज्याचे सारे राजकारणच बदलून गेले. आज त्यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. बंडखोरी होऊन एक वर्ष उलटले तरी राज्याच्या राजकारणावर त्याचा प्रभाव कायम आहे. आज ठाकरे गट 'खोके दिन' साजरा करत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस 'गद्दार दिन', तर शिंदे गट 'स्वाभिमान दिन' साजरा करत आहे!

एकनाथ शिंदे यांच्या बंडाची टाइमलाइन :

एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल' : 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुकीनंतर लगेचच एकनाथ शिंदे गायब झाले. ते 'नॉट रिचेबल' होते. काही वेळाने कळले की, शिंदे शिवसेनेच्या इतर 11 आमदारांसह भाजपशासित गुजरातच्या सूरत शहरात आहेत. दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली. मात्र त्या बैठकीला एकनाथ शिंदेसह तब्बल 10-12 आमदारांनी गैरहजेरी लावली.

शिंदे यांची व्हीप पदावरून हकालपट्टी : त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या व्हीप पदावरून हकालपट्टी केली. शिवसेनेने त्यांचे आणखी आमदार शिंदेंसोबत जाऊ नये म्हणून त्यांना मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये ठेवले.

शिंदेंनी महाविकास आघाडी सोडण्यास सांगितले : त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अपील केली. शिंदेनी ठाकरेंना 'अनैसर्गिक' महाविकास आघाडी तोडून भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले. शिंदे यांनी दावा केला की त्यांना 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे. कायद्यानुसार, शिंदे यांना 37 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता (एकूण 55 च्या दोन तृतीयांश संख्याबळ), नाहीतर त्यांना पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्र ठरवले गेले असते.

उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला : 22 जून रोजी, एकनाथ शिंदे 40 आमदारांसह भाजपशासित आसाममधील गुवाहाटीला गेले. त्याच दिवशी, संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली की, ते आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यास तयार आहेत. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांचे अधिकृत 'वर्षा' निवासस्थान सोडतात आणि त्यांच्या खाजगी निवासस्थानी जातात.

शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित : 23 जून रोजी 37 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते घोषित केले. 24 जून रोजी शिवसेनेने बंडखोर आमदारांच्या विरोधात याचिका दाखल केली आणि विधानसभेतील उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिंदे कॅम्पच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपला पाठिंबा देणाऱ्या दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. यावर बंडखोरी केलेल्या 34 आमदारांची स्वाक्षरी होती. मात्र झिरवाळ यांनी हा ठराव फेटाळला. कारण आमदारांनी याचिका स्वत: न पाठवता एका निनावी इमेलने पाठवली होती.

शिंदे-अमित शाह भेट : त्याच दिवशी, एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शाह आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुजरातमधील वडोदरा येथे भेट घेतली. 26 जून रोजी, शिंदे उपसभापतींनी विश्वासदर्शन ठराव अर्ज नाकारल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना 'शिवसेना नेता' पदावरून हटवले.

शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली : शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर 10 दिवसांतच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर 1 जूलै रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 40 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.

हेही वाचा :

  1. NCP Ccelebrated Gaddar Divas: पुण्यात आज '50 खोके एकदम ओके' म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने साजरा केला गद्दार दिवस, शहराध्यक्ष म्हणाले...
  2. Maharashtra Politics: शिवसेनेतील बंडाची धग कायम...राष्ट्रवादी, ठाकरे गट व शिंदे गटाकडून वेगवेगळे दिन साजरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.