ETV Bharat / state

बेस्टच्या वीज दरात एक रुपयाची होणार कपात; एप्रिल २०२० पासून निर्णय लागू

मुंबई पालिकेकडून चालविण्यात येणाऱ्या बेस्टच्या उपक्रमाकडून वीज पुरवठा देखील केला जातो. बेस्ट वीज पुरवठा करत असलेल्या विभागात कमी दरामध्ये टाटा वीज पुरवठा करत आहे. त्यामुळे बेस्टचे ग्राहक त्यांच्याकडे वळत आहे. त्यामुळे बेस्टने विजेचा दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:04 AM IST

मुंबई - बेस्ट उपक्रमाकडून वीज आणि परिवहन सेवा पुरवली जाते. परिवहन सेवेचे प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बेस्टच्या वीज विभागाचे ग्राहक टाटा या वीज कंपनीकडे गेले आहेत. या ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी बेस्टने आपल्या वीज दरात एका रुपयाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात एप्रिल २०२० पासून लागू होईल, असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले.

बेस्टच्या वीज दरात एक रुपयाची होणार कपात

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत बेस्ट उपक्रम काम करतो. बेस्टकडून परिवहन सेवा तसेच वीज पुरवठा केला जातो. बेस्टकडून वीज सेवा पुरवठा केल्या जाणाऱ्या विभागात टाटा या खासगी वीज कंपनीला वीज पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टाटाची वीज स्वस्त असल्याने बेस्टचे ग्राहक टाटाकडे वळले आहेत. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. त्यामुळे बेस्ट बसचे प्रवासी आणि वीज कंपनीकडे ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीज दर कमी केले जाणार आहेत.

बेस्टचा २०१७ - १८ मध्ये ८.२३ रुपये इतका वीज दर होता. २०१८ - १९ मध्ये हा दर ७.९९ रुपये इतका होता. म्हणजेच २०१७ - १८ पेक्षा २०१८ - १९ मध्ये ०.२४ रुपये प्रतियुनिट दर कमी झाला होता. २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी विजेचा दर ६.९९ रुपये इतका ठेवण्याचे बेस्टने सुचवले आहे. हा दर येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात समावेश करून त्याला मंजूर करून घेतला जाणार आहे. बेस्टचा अर्थसंकल्प बेस्ट समितीनंतर पालिकेच्या स्थायी समिती व सभागृहात मंजूर करावा लागतो. त्यामुळे हा दर एप्रिल २०२० पासून लागू होईल, असे बेस्ट अनिल पाटणकर यांनी सांगितले.

Intro:मुंबई - बेस्ट उपक्रमाकडून वीज आणि परिवहन सेवा पुरवली जाते. परिवहन सेवेचे प्रवासी वाढण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरु आहेत. बेस्टच्या वीज विभागाचे ग्राहक टाटा या वीज कंपनीकडे गेले आहेत या ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी बेस्टने आपल्या वीज दरात एका रुपयाची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात एप्रिल २०२० पासून लागू होईल असे बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले. Body:मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत बेस्ट उपक्रम काम करतो. बेस्टकडून परिवहन सेवा तसेच वीज पुरवठा केला जातो. बेस्टकडून वीज सेवा पुरवठा केल्या जाणाऱ्या विभागात टाटा या खासगी वीज कंपनीला वीज पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. टाटाची वीज स्वस्त असल्याने बेस्टचे ग्राहक टाटाकडे वळले आहेत. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. यामुळे बेस्ट बसचे प्रवासी आणि वीज कंपनीकडे ग्राहक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीज दर कमी केले जाणार आहेत.

बेस्टचा २०१७ - १८ मध्ये वीज दर ८.२३ रुपये इतका होता. २०१८ - १९ मध्ये हा दर ७.९९ रुपये इतका होता. २०१७ - १८ पेक्षा २०१८ - १९ मध्ये ०.२४ रुपये प्रतियुनिट दर कमी झाला होता. २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी विजेचा दर ६.९९ रुपये इतका ठेवण्याचे बेस्टने सुचवला आहे. हा दर येत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात समावेश करून त्याला मंजुर करून घेतला जाणार आहे. बेस्टचा अर्थसंकल्प बेस्ट समितीनंतर पालिकेच्या स्थायी समिती व सभागृहात मंजूर करावा लागतो. त्यामुळे
हा दर एप्रिल २०२० पासून लागू होईल असे बेस्ट अनिल पाटणकर यांनी सांगितले.

बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.