ETV Bharat / state

पीएमसी बँक घोटाळा : तणावात असलेल्या आणखी एका बँक खातेदाराचा मृत्यू - pmc bank customer death

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांच्या समस्या सुटन्याचे नावच घेत नाही आहे. पीएमसी बँकेत कायम ठेवी स्वरूवात गुंतलेल्या पैशांमुळे अडचणीत सापडलेल्या एका ग्राहकाचा मृत्यू झाला होता. यातच आणखी एका ग्राहकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पीएमसी बँक घोटाळा
author img

By

Published : Oct 15, 2019, 5:45 PM IST

मुंबई - पीएमसी बँक घोटाळा संदर्भात हवालदिल झालेल्या बँक ग्राहकांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यातच पीएमसी बँकेमध्ये स्वतःची कमाई ठेवी स्वरूपात ठेवलेल्या संजय गुलाटी या व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. यानंतर आणखीन एका बँक खातेदाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. फत्तोमल पंजाबी (५९) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंगळवारी मुलुंड परिसरात राहणाऱ्या फत्तोमल पंजाबी या व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील मुलुंड कॉलनी मध्ये राहणाऱ्या पंजाबी यांची रोख रक्कम ठेवी स्वरूपात पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत होती. मात्र, बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पंजाबी हे आर्थिक अडचणीत सापडलेले होते. त्यामुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या पंजाबी यांना मंगळवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - पीएमसी बँके प्रकरणी तणावाखाली असलेल्या बँक खातेदाराचा मृत्यू

Intro:पीएमसी बँक घोटाळा संदर्भात हवालदिल झालेल्या बँक ग्राहकांच्या समस्या अजूनही सुटलेला नाहीत. त्यातच पीएमसी बँकेत स्वतःची कमाई ठेवी स्वरूपात ठेवलेल्या संजय गुलाटी या व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आणखीन एका बँक ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे.
Body:मंगळवारी मुलुंड परिसरात राहणाऱ्या फत्तोमल पंजाबी या 59 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील मुलुंड कॉलनी मध्ये राहणाऱ्या फत्तोमल पंजाबी यांची रोख रक्कम ठेवी स्वरूपात पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत होती . पण बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फक्तमला पंजाबी हे आर्थिक अडचणीत सापडलेले होते. प्रचंड तणावाखाली असलेल्या पत्तंमल पंजाबी यांना मंगळवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.