ETV Bharat / state

बेस्टच्या अपघातात तरुणीचा मृत्यू, एक जखमी

author img

By

Published : Dec 8, 2020, 10:07 PM IST

बेस्ट बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना मुंलुडच्या दिशेला घडली असून नौपाडा पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

मुंबई - बेस्ट बसचा ताफा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून खासगी एसी बसेस चालवण्यात येत आहेत. या बस आता बेस्टसाठी डोकेदुखी ठरत आहेत. खासगी एसी बसपैकी एका बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 8 डिसें.) सायंकाळी 4 ते 4:30 च्या दरम्यान ठाणे येथील तीन हात नाक्यावरून महामार्गाने मुलुंडच्या दिशेने एका मोटारसायकलवरून (क्र. एम एच 04 एच सी 1319) जाणाऱ्या दोन जणांना बेस्टच्या सी 42 या बेस्टच्या बसने धडक दिली. ही मोटारसायकल प्रमोद बाळकृष्ण सैम (वय 34 वर्षे) हा चालवत होता. तर पाठीमागे समीक्षा सचिन परब (वय 35 वर्षे, रा. दिवा) ही तरुणी बसली होती. बसचा धक्का लागताच दोघेही गाडीसह खाली पडले मागच्या सीटवर बसलेली समीक्षा खाली पडली. त्याचवेळी बसच्या मागचे चाक तिच्या मानेवरून गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. मोटारसायकल चालवणारा प्रमोद सैम बेशुद्ध झाल्यामुळे त्याला एका टेम्पोतून रुग्णालयात नेण्यात आले. नौपाडा पोलिसांनी बेस्टची बस व मोटारसायकल दोन्ही ताब्यात घेतली आहे.

कंत्राटी चालकांबाबत वाहन वेगाने चालविल्याच्या तक्रारी

बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टने खासगी एसी बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती मोटर्सने बेस्टला 500 बसेस भाडेतत्वावर दिल्या आहेत. या बसवर कंत्राटी चालक आहेत. कंत्राटी चालक वेगाने गाडी चालवतात, अशी आधीच तक्रारी येत होत्या. यावरून येत्या काळात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - ॲमेझॉनला मराठी नको, मग आम्हालाही महाराष्ट्रात अ‌ॅमेझॉन नको; मनसेचा इशारा

हेही वाचा - विकासकांकडील 320 कोटी रुपये 'बेस्ट'ने वसूल करावे, विरोधी पक्षनेत्यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.